हिरोगिरी नडली! तरुणाच्या 'त्या' कृत्यावर भडकला जंगलाचा राजा; पहा नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी साठी लोक काय करतील सांगता येत नाही. लोकांना सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे वेडं लागले आहे. यासाठी लोक आपला जीव देखील धोक्याता घालायला मागे-पुढे पाहत नाहीत. रोज विचित्र विचित्र जीवघेणे स्टंट करत असतात. अनेकदा या स्टंटबाजीमुळेे, हिरोगिरीमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र तरीही लोकांना कोणतीही पर्वा नाही. सध्या असेच काही कृत्य एका तरुणाने केले आहे. यामुळे त्याची पळता भूई झाली आहे. तरुणाला जंगलाच्या राजाची छेड काढणं महागात पडलं आहे.
ही घटना गुजरातमधील आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये एक तरुण सिंहाजवळ त्याच्या शिकारीचा व्हिडिओ आणि फोटो काढायला गेला होता, परंतु त्याच्या या कृत्यावर जंगलाचा राजा सिंह चांगलाच भडकला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिरवागार जंगलाचा घनदाट परिसर दिसत आहे. येथेच एक सिंह आपल्या शिकारीचा आनंद लुटत आहे. याच वेळी एक तरुण याचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्या सिंहाजवळ जातो. तरुणाला पाहताच सिंह त्याच्या दिशेने धाव घेतो. यामुळे तरुणाला उलटे माघारी परतावे लागते. सुदैवाची बाबा म्हणजे सिंहाने तरुणावर हल्ला केलेला नाही, परंतु जर सिंहाने हल्ला केला असता तर यामुळे त्याचा जीवही गेला असता.
गुजरात के सौराष्ट्र से एक बेहद डरा देनेवाला वीडियो सामने आया है..!🥺 भावनगर में एक युवक शिकार के पास बैठे शेर का वीडियो और फोटो लेने के उसके पास पहुंच गया..!🥺 युवक की इस हरकत पर जंगल के राजा को क्रोध आ तो उसे उल्टे पांव लौटना पड़ा..! pic.twitter.com/l6kwNAcmV5 — 𝗠𝗮𝗿𝗶𝘆𝗮𝗺_𝗠𝗕𝗗 (@Mariyam_MBD) August 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
तज्ज्ञांच्या मते, एकादा प्राणी मग तो हिंसक असो त्याला धोका वाटत नाही, तोपर्यंत कोणावरही हल्ला करत नाही. कदाचित सिंहाला तरुणापासून कोणता धोका जाणवला नसेल. यामुळे तरुणाचा जीव वाचला. परंतु तरुणाचे हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.
कितने तेजस्वी लोग है! कचरा फेकण्यासाठी चक्क डिलिव्हरी बॉयला बोलावलं…; पुढे जे घडलं ते, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.