Jogeshwari fire case gas cylinder explosion in Oshiwara furniture market news
नायजेरियाच्या शाळेत भीषण दुर्घटना घडली आहे. शाळेला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल आहे. तर या आगीत काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही आग नेमकी कशी लागली, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, नायजेरियाच्या शाळेत आग लागली, त्यावेळी शाळेत एकूण १०० विद्यार्थी होते. या घटनेत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळेल्या लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग लागल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी पीडितांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी शाळेतील जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मागील महिन्यात देखील नायजेरियाची राजधानी अबुजा भागात एका शाळेला आग लागली होती. शाळेल्या लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला होता.
नेमकं कशामुळे घडली घटना?
शाळेत नेमकी कशी आग लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं एजन्सीने म्हटलं आहे. मिळालेल्या प्राथमिक निष्कर्षावरून दिसून आले की, शाळेजवळ काही काठ्या ठेवण्यात आल्या होत्या. या काठ्यांना स्थानिक भाषेत ‘कारा’ म्हटलं जातं. याच काठ्यांमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी पीडित कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचे आवाहनही त्यांनी केलं.