Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

हिंदुस्थान पेट्रोलियम समोरील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन संपूर्ण हॉटेल आगीत खाक झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 01:27 PM
कदमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

कदमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

Follow Us
Follow Us:
  • कदमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट
  • बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक
  • लाखो रुपयांचे नुकसान
कदमवाकवस्ती : हिंदुस्थान पेट्रोलियम समोरील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन संपूर्ण हॉटेल आगीत खाक झाले आहे. गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

पुणे–सोलापूर महामार्गावरील संभाजीनगर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील हे हॉटेल नेहमीप्रमाणे सुरू असताना रात्री किचनमध्ये गॅस गळती झाली. काही क्षणांतच मोठा स्फोट झाला आणि आगीने भीषण रूप धारण केले. हॉटेलमधील गिऱ्हाईक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बाहेर पळ काढला. आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या व्यावसायिकांनी दुकाने बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी हॉटेलमधील दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण हॉटेल ज्वाळांनी वेढले गेले.

कदमवाकवस्ती परिसरात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने हडपसर, वाघोली व वानवडी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या. घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास लागला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली; परंतु तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर, स्वयंपाकघरातील साहित्य, फ्रीज, गॅस यंत्रणा व इतर सर्व मालमत्ता पूर्णतः जळून खाक झाली होती. लोणी काळभोर पोलिसांनीही त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, आगीच्या दिवशीच गॅस रिपेअरिंगचे काम झाले होते आणि सिलेंडरचा वॉशर बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे घटनेबाबत संशय व्यक्त केला जात असून “तेरी भी चुप, मेरी भी चुप” अशी चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्व हवेली परिसरातील हॉटेल्सची नियमित तपासणी होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. सर्व हॉटेल्सचे फायर ऑडिट, गॅस लाईन तपासणी आणि व्यवसाय परवान्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक

सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्न

लोणी काळभोर–कदमवाक वस्ती परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना स्वतंत्र अग्निशमन केंद्र नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचण्यास विलंब होतो. भविष्यात मोठी जीवितहानी टाळण्यासाठी या भागात कायमस्वरूपी अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या भीषण घटनेमुळे प्रशासनाच्या सज्जतेवर आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Biryani hotel gutted in fire due to massive gas cylinder explosion in kadawasti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Fire
  • Fire News
  • Gas Cylinder
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
1

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…
2

Pune Crime : जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?
3

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?
4

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.