6-1 magnitude Earthquake hits northwestern turkey one women killed
Turkey Earthquake News marathi : इस्तंबूल : भूकंपाच्या (Earthquake) तीव्र धक्क्यांनी तुर्की (Turkey) हादरला आहे. रविवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी वायव्य तुर्कीच्या बालिकेसीरमध्ये तीव्र भूकंप झाला. ६.१ रिश्टर स्केल भूंकपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे आहे. यामुळे बालिकेसीरमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर २९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र सिंदरही शहरात होते. या ठिकाणीच ८१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिला इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तुर्कीच्या आपत्कालीन सेवा आणि बाचव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तुर्कीच्या अनेक भागांमध्ये बचाव पथके, वाहने, मदतीची साधने पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या आपत्कालीन आणि बचाव पथकांनी मदत कार्य सुरु केले आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे जवळपास १६ इमारती कोसळल्या आहेत. यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळी ७.५३ वाजता हा भूंकप घडला. तुर्कीच्या इस्तंबूलपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत
BREAKING: A strong quake hit Balıkesir Province, collapsing at least 10 buildings in Sındırgı District, according to the mayor. Rescue efforts are underway. pic.twitter.com/cP3IdcQgD7
— Weather Monitor (@WeatherMonitors) August 10, 2025
भूकंपानंतर आफ्टरशॉक
भूकंपामुळे तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये याचा तीव्र परिणाम झाला. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले की, भूकंपानंतर आणखी काही धक्के बसले. यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. यामध्ये सर्वा मोठा भूकंप ४.६ रिश्टर स्केलचा नोंदवण्यात आला. सध्या लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा, तसेच इमारतींजवळ न जाण्याचा, सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
या भूकंपाचे धक्के तुर्कीच्या इस्तंबूल, मनिसा, इझमीर, उसाक आणि बुर्सा प्रांतांमध्येही जाणवले. पहिल्या भूकंपानंतर ३.० तीव्रतेपेक्षा अधिक रिश्टर स्केलचे आफ्टरशॉक जाणवले असल्याचे AFAD ने सांगितले. राष्ट्राध्यक्ष एर्दोगान रेसेप तय्यिप यांनी भूकंपामुळे जखमी झालेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थाना केली आहे. तसेच त्यांनी सर्व आपत्कालीन संस्थांना लोकांपर्यंत तातडीने मदत कार्य पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देव आपल्या देशाचे आणि नागरिकांचे सर्व आपत्तींपासून रक्षण करो.
A video captures the tremors from the M6.1 earthquake that struck western Turkey. #deprem pic.twitter.com/JXWRsvRvh5
— Weather Monitor (@WeatherMonitors) August 10, 2025
FAQs (संबंधित प्रश्न )
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या खडकांच्या १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, या सततच्या हालचालींमुळे ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्यामुळे भूकंप घडतात.
तुर्कीत सतत भूकंप का होत असतात?
तुर्की ही एनाटोलियन टेक्टॉनिक प्लेटवर स्थित आहे, जी आफ्रिकन आणि यूरोपियन प्लेट्सच्या मध्ये अडकलेली आहे. या प्लेट्स एकमेकांवर घासल्या जातात. या प्लेट्सच्या सततच्या घर्षणामुळे उर्जा बाहेर पडते, ज्यामुळे तुर्कीत वारंवार भूकंप होत असतात.
यापूर्वी तुर्कीमध्ये सर्वात विनाशकारी भूकंप केव्हा आला होता?
यापूर्वी २०२३ मध्ये तुर्कीमध्ये सर्वात विनाशकारी भूकंप आला होता. याची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल होती. या भयावह भूकंपामध्ये ५३ हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते.
Ukraine-Russia war: युक्रेन-रशिया युद्ध संपणार; १५ ऑगस्टला अलास्कात डोनाल्ड ट्रम्प- पुतिन यांची भेट