
Bangladesh Earthquake : पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही मोठा भूकंप; बंगालमध्ये जमीन हादरली...
ढाका : पाकिस्तानला शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाने हादरवले. उत्तर पाकिस्तानमध्ये स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 2.39 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यानंतर आता बांगलादेशमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 इतकी मोजण्यात आली. भूकंपावर लक्ष ठेवणारी अमेरिकन संस्था यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र बांगलादेशातील नरसिंगडीजवळ असल्याची माहिती दिली.
बांगलादेशात झालेल्या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. बांगलादेशमध्ये 5.5 रिश्टर स्केलवर आलेल्या भूकंपानंतर, पश्चिम बंगालमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बांगलादेशातील नरसिंगडीजवळ होते. सध्या, कोणत्याही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती दिली जात आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे तीव्र भूकंप झाला. शुक्रवारी सकाळी ढाका आणि आसपासच्या भागात अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.7 होती.
दरम्यान, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:40 वाजता हा भूकंप झाला आणि सुमारे 20 सेकंद जमीन हादरत राहिली. बांगलादेशमध्ये झालेल्या भूकंपाने भारतातील पश्चिम बंगालच्या काही भागांनाही हादरवले. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक घराबाहेर पडले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि सुरक्षा यंत्रणांनी अनेक ठिकाणी खबरदारी घेतली आहे.
पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के
काही तासांपूर्वीच भारताच्या शेजारील देश पाकिस्तानला भूकंपाचे धक्के बसले. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानमध्ये ५.२ रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १३५ किलोमीटर खाली होते. त्यामुळेच भूकंपाचा तीव्र परिणाम झाला नाही. पाकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या अनेक भागातही जाणवले.
पाकिस्तानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के
पाकिस्तानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र पाकिस्तान–अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या डोंगराळ आणि भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशात होते. भूकंपाची खोली सुमारे १३५ किलोमीटर इतकी होती, जी तुलनेने अधिक मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, अशा खोल भूकंपांमध्ये ऊर्जा पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच मोठ्या प्रमाणात शोषली जाते, त्यामुळे जमिनीवरील हादरे तुलनेने कमी तीव्र असतात. त्यामुळेच व्यापक नुकसान टळले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : Earthquake Update : पाकिस्तानला पहाटे 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का; उत्तरेकडील भाग हादरला, केंद्र अफगाण सीमेवर