
Breaking News Updates Today: परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारची तयारी सुरु, असा आहे प्लॅन...
Maharashtra to World Breaking News: अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी ईराणवर केलेल्या हल्ल्यांचा गंभीर परिणाम पाहायला मिळत आहे. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विमान सेवा देखील विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. गरजेनुसार विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालवत आहेत.
04 Mar 2026 06:51 PM (IST)
South africa national cricket team vs New zealand national cricket team: टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (SA vs NZ) यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर दुसऱ्या संघाचा प्रवास तिथेच संपेल. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून दक्षिण आफ्रिकेला गोलंदाजीसाठी अंमत्रित केले आहे. न्यूझीलंडच्या संघात एक बदल आहे. जिमी नीशमचे पुनरागमन. ईश सोधी आजच्या सामन्यात खेळत नाहीये. दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत. कागिसो रबाडा, मार्को यान्सन आणि केशव महाराज परतले आहेत.
04 Mar 2026 06:43 PM (IST)
मुंबई : स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि कामगारांचे जीव सुरक्षित राहतील. २००८ मध्ये तयार झालेल्या स्फोटक कारखान्यांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
04 Mar 2026 06:29 PM (IST)
विजया गिरमे – Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहराच्या दळणवळणात मैलाचा दगड ठरणाऱ्या पिंपरी ते निगडी या मेट्रो विस्तारीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या कामाच्या संथ गतीमुळे आणि मुंबई-पुणे महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. एका बाजूला २०२७ अखेरपर्यंत स्वारगेटपर्यंत थेट प्रवासाचे स्वप्न प्रशासन दाखवत असताना, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांमुळे ‘विकासाची वाट’ खडतर झाली आहे. Pune Metro
04 Mar 2026 06:19 PM (IST)
India Russia Defense Deal: मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि जागतिक युद्धाची दाट शक्यता पाहता, भारताने आपल्या हवाई संरक्षण दलाला (Air Defense) अधिक आधुनिक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा हवेतच खात्मा करणाऱ्या रशियन बनावटीच्या ‘S-400’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या अतिरिक्त युनिट्ससाठी भारत लवकरच एक मोठी डील फायनल करणार आहे. भारतीय वायुसेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही प्रणाली ‘गेम-चेंजर’ मानली जात आहे.
04 Mar 2026 06:01 PM (IST)
मुंबई, दि.४ : 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ता' योजनेच्या माध्यमातून राज्यातील १,७४,४७५ शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.आता प्रत्येक पाणंद रस्त्याला क्रमांक असेल आणि त्या क्रमांकाची नोंद सर्व रेकॉर्डवर असणार आहे, प्रत्येक गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करून पाणंद रस्त्यांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे चालणारे बांधावरील वाद मिटण्यास मदत होणार आहे असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले.
04 Mar 2026 06:01 PM (IST)
मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि जागतिक युद्धाची दाट शक्यता पाहता, भारताने आपल्या हवाई संरक्षण दलाला (Air Defense) अधिक आधुनिक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा हवेतच खात्मा करणाऱ्या रशियन बनावटीच्या ‘S-400’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या अतिरिक्त युनिट्ससाठी भारत लवकरच एक मोठी डील फायनल करणार आहे. भारतीय वायुसेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही प्रणाली ‘गेम-चेंजर’ मानली जात आहे.
04 Mar 2026 05:33 PM (IST)
बारामती शहरातील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव) (मूळ राहणार, नागपूर वय २६, हल्ली बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर,कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली.
04 Mar 2026 05:13 PM (IST)
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ताज्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याची पाकिस्तान कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. जर ही नियुक्ती झाली, तर सरफाराज हा ऑक्टोबर २०२५ पासून अंतरिम जबाबदारी सांभाळणाऱ्या अझहर महमूदची जागा घेईल.
04 Mar 2026 04:51 PM (IST)
सध्या मिडल ईस्ट भागात इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेने युद्ध पुकारले आहे. इराणवर अमेरिका, इस्त्रायल जोरदार हल्ले करत आहे. इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे.
04 Mar 2026 04:40 PM (IST)
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने घोषणा केली की, उच्च दर्जाचा हाय-फाय ऑडिओ व दैनंदिन वीअरेबिलिटीला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या त्यांच्या गॅलेक्सी बड्स४ प्रो आणि गॅलेक्सी बड्स४ च्या प्री-ऑर्डरला आजपासून सुरूवात होत आहे.
04 Mar 2026 04:31 PM (IST)
बिग बॉस मराठी ६च्या घरात वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नव्या स्पर्धकांच्या आगमनामुळे घरातील आधीची समीकरणं पूर्णपणे बदलली असून आता खेळ अधिक रंजक बनला आहे.
04 Mar 2026 04:20 PM (IST)
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनी (Iran-Israel conflict) आणि त्यानंतर इराणने दिलेल्या प्रत्युत्तराने संपूर्ण जगाचे राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र, या जागतिक गदारोळात भारताची भूमिका सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली आहे.
04 Mar 2026 04:07 PM (IST)
भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नावांचा समावेश असून, पक्षाने सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्यावर भर दिला आहे.
04 Mar 2026 04:00 PM (IST)
मुंबई येथे पार पडलेल्या करिअर कट्टा उपक्रमाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विरारमधील विवा महाविद्यालयाने तब्बल ११ पुरस्कार पटकावत राज्यात आपला दबदबा सिद्ध केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
04 Mar 2026 03:45 PM (IST)
Vinod Tawade Rajyasabha : मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने राज्यातील चार जणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने (BJP Politics) सात राज्यसभेच्या जागांपैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, (Vinod Tawde) सामाजिक कार्यकर्त्या मायाताई इवनाटे आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही विनोद तावडेंची आहे. त्यांनी भाजप पक्षासाठी केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
04 Mar 2026 03:25 PM (IST)
Israel Iran War News in Marathi : जेरुसलेम/तेहरान : मध्यपूर्वेत सध्या इस्रायल-इराण युद्धामुळे (Israel Iran War) अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच तणावादरम्यान इराणने आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या इस्रायली हल्ल्यात निधनानंतर त्यांचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेई यांची नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने मोठी धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायलविरोधी प्रत्येक नेत्याला ठार केले जाईल.
04 Mar 2026 03:15 PM (IST)
कुडाळ: कुडाळ-मालवण मार्गावर कल्पना अपार्टमेंट समोर सोमवारी सकाळी सुमारे ११.१० वाजता झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात स्कुटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर बसून एक दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर हा नेरूर येथून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी हा ट्रक कल्पना अपार्टमेंट समोर आल्यावर अचानक व धोकादायकरीत्या आपल्या ट्रकचा वेग कमी केला.
04 Mar 2026 03:05 PM (IST)
चंद्रपूर: उन्हाळा आणि पाणीटंचाई असे समीकरण ठरलेलेच असते. यंदाही पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील ५३९ गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वेळेआधीच नियोजन करत १६ कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ५३९ गावांसाठी एकूण ६९३ विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतच प्रस्ताव सोमवारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे.
04 Mar 2026 02:50 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्ध आता केवळ पश्चिम आशियापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचे पडसाद आता दक्षिण आशियातील राजकारणातही उमटू लागले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Pakistan’s Defense Minister Khawaja Asif) यांनी भारत आणि इस्रायलवर अत्यंत गंभीर आणि चिथावणीखोर आरोप केले आहेत.
04 Mar 2026 02:45 PM (IST)
तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असलेल्या थलापती विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्यातील घटस्फोटाचा खटला आता वेगाने वाढत चालला आहे. संगीताने अलीकडेच चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये विजयवर विवाहबाह्य संबंध आणि गंभीर वैवाहिक समस्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता, अहवाल असे सूचित करतात की विजय न्यायालयाबाहेर हे प्रकरण पोटगी देऊन सोडवू इच्छित आहे.
04 Mar 2026 02:40 PM (IST)
सध्या भारतात विविध ठिकाणी होळीचे सेलिब्रेशन सुरु आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात होळी वेगवेळ्या पद्धतीने खेळली जाते. भारतातील होळी केवळ करमणूक नाही, तर इतिहासाची आणि संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. उत्तर भारतात रंग, गुलाल आणि पाणी उडवत खेळली जाते. पंजाबमध्ये होला मोहल्ला म्हणून रंग उधळला जातो.
04 Mar 2026 02:35 PM (IST)
Ind vs Eng यांच्यातील ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्चला मुंबईत होणार आहे. हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू सॅम करनने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे ते सध्या चांगलंच चर्चेत आहे.
04 Mar 2026 02:30 PM (IST)
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत स्तरावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना जाहीर केलेला प्रोत्साहनपर मोबदला अद्यापही पूर्णपणे मिळालेला नाही. जिल्ह्यातील २३७८ पैकी ६७९ आशा अजूनही मानधनापासून वंचित आहेत. मात्र, आता काही आशांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
04 Mar 2026 02:25 PM (IST)
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर आतापर्यंतचं सर्वात खास फीचर ठरणार आहे. आपण व्हॉट्सअॅपवर आपल्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चॅट्स पिन करून ठेवतो. कधी 1 तर कधी 2 चॅट्स आपण पिन करतो. कंपनीने प्रत्येक व्हॉट्सअॅप यूजरला 3 चॅट्स पिन करण्याची लिमिट सेट केली आहे. अशावेळी जेव्हा आपल्याला 5 किंवा 6 चॅट्स पिन करायच्या असतात, तेव्हा गोंधळ होतो.
04 Mar 2026 02:20 PM (IST)
गेले चार ते पाच दिवसांपासून इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेत मोठे युद्ध सुरू आहे. इराणच्या प्रमुख नेत्याला ठार मारल्यामुळे इराण खवळला आहे. इराणने दुबई, कुवेत, कतार आणि अन्य देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले आहेत. त्यातच इराणने आता तेल (Petrol-Diesel) बहतुक होणारा मार्ग बंद केल्याचे समोर येणार आहे. त्यामुळे युद्ध लांबले तर त्याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.
04 Mar 2026 02:15 PM (IST)
अभिनेता रवि दुबेने आपल्या दमदार फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची झलक शेअर करत सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या शर्टलेस फोटोमध्ये ते फोकस्ड बॉक्सिंग स्टान्समध्ये दिसत असून त्यांचा चिझल्ड फिजिक, सुबक मसल्स आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. “Rising Up” या कॅप्शनसह आणि पार्श्वभूमीला वाजणाऱ्या ‘Eye of the Tiger’ या आयकॉनिक ट्रॅकमुळे पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी कठोर शारीरिक ट्रेनिंग घेतल्याचे या फोटोवरून स्पष्ट दिसते आहे.
04 Mar 2026 02:04 PM (IST)
मध्यप्रदेश: पती-पत्नी मध्येवाद होणं हे साहजिक आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलच्या कारणावरून पती- पत्नीमध्ये वाद झाला आणि दुसऱ्याच दिवशी पत्नीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट्सच्या प्रतीक्षेत आहेत.
04 Mar 2026 01:55 PM (IST)
पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये भयकंर युद्ध सुरु आहे. याचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि सागरी वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय अनेक भारतीय नागरिकही मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये आडकले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समुद्रात भारताच्या व्यापाराचे रक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
04 Mar 2026 01:45 PM (IST)
ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. क्रिकेट सामन्यावर पावसाच्या सावटाबाबत साशंका व्यक्त केली जात होती पण क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे की या मॅचदरम्यान वातावरण पूर्णपणे साफ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
04 Mar 2026 01:40 PM (IST)
राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. त्यामुळे शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
04 Mar 2026 01:35 PM (IST)
नाशिक येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना पालकांना समजताच संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतली आहे. इगतपुरीच्या समाजकल्याण वसतिगृहात हा संतापजनक प्रकार घडला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
04 Mar 2026 01:30 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याची चर्चा संपूर्ण जगात सुरू असतानाच, मध्यपूर्वेतून एका थरारक बातमीने जगाला हादरवून सोडले आहे. पंतप्रधान मोदी २६ फेब्रुवारीला मायदेशी परतले आणि अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत हल्ला चढवला. या हल्ल्याच्या टायमिंगबद्दल आता भारतात नियुक्त असलेले इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला असून, यामागील राजनैतिक आणि लष्करी रणनीती उघड केली आहे.
04 Mar 2026 01:25 PM (IST)
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामतीमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यावर आता संशय व्यक्त केला जात असून हा घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या अपघाताची (Ajit Pawar Plane Crash) पूर्ण सखोल चौकशी व्हावी यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या अहवालावर ताशेरे ओढले आहेत.
04 Mar 2026 01:18 PM (IST)
इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक बाजारपेठा अडचणीत आल्या आहेत. बुधवारी सकाळ आशियाई बाजारपेठांसाठी काळा दिवस होता. गुंतवणूकदारांच्या भीतीमुळे दक्षिण कोरियापासून जपान आणि तैवानपर्यंतचे शेअर बाजार पत्त्यांच्या घरासारखे कोसळले. दक्षिण कोरियाच्या बाजारातील KOSPI ला सर्वात गंभीर नुकसान सहन करावे लागले. मंगळवारी ७.२% घसरणीनंतर, बुधवारी सकाळपर्यंत निर्देशांक १२.३% घसरला, जो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक आहे. सोलमधील बाजारपेठा सर्किट ब्रेकरच्या धोक्याचा सामना करत आहेत कारण गुंतवणूकदार त्यांच्या होल्डिंग्ज विकत आहेत.
04 Mar 2026 01:10 PM (IST)
भाजपने महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागांपैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि इतर दोघांना उमेदवारी दिली आहे.नवी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने जारी केलेल्या पक्षाच्या प्रेस विज्ञप्तीनुसार, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.
04 Mar 2026 01:05 PM (IST)
पश्चिम आशियातील रणकंदन आता एका निर्णायक वळणावर आले आहे. इस्रायल आणि इराण (Iran Israel war) समोरासमोर असताना सर्वांच्या नजरा ज्या ‘ड्रॅगन’कडे लागल्या होत्या, त्याने आता आपले खरे रूप दाखवले आहे. इराणसोबत २५ वर्षांचा सुरक्षा करार आणि प्रचंड गुंतवणुकीच्या वल्गना करणाऱ्या चीनने प्रत्यक्ष युद्धात मात्र इराणपासून सुरक्षित अंतर ठेवले आहे. यावरून आता एकच प्रश्न विचारला जात आहे. चीन हा खरोखर इराणचा मित्र आहे की केवळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी बसलेला एक धूर्त सावकार?
04 Mar 2026 01:00 PM (IST)
जुन्नर नगरपालिकेची अर्थसंकल्प मंजुरीची सभा पार पडली. या सभेमध्ये नगरपालिकेच्या 150 कोटी 13 लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती जुन्नर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी दिली. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
04 Mar 2026 12:55 PM (IST)
नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग परिसरातून बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय झोया खान हिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला. अपहरणाचा गुन्हा दाखल असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
04 Mar 2026 12:50 PM (IST)
आरमोरी येथे रंगोत्सवानंतर वैनगंगा नदीत आंघोळीस गेलेल्या 25 वर्षीय तरुण अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला. शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जळाऊ लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे
04 Mar 2026 12:45 PM (IST)
मुंबई शहरात सोमवारी (2 मार्च 2026) रात्री पारंपरिक होळ्या पेटल्या असताना मंगळवारी (3 मार्च) मुंबईतील २१ ठिकाणी हवेचा दर्जा (एक्यूआय) १०० च्या सरासरीतच नोंदविला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरवी सामान्य दिवसांत महिन्यातून ववचितच एक्यूआय १५० च्या पुढे जात असल्याची नोंद होत असताना, होळ्यांच्या पार्श्वभूमीवर मात्र हवा दर्जा १००च्या सरसरीत राहिल्याचे निरीक्षण समोर आले.
04 Mar 2026 12:45 PM (IST)
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर आता संपूर्ण जगात एकच चर्चा सुरू आहे – “जगातील सर्वात कडक सुरक्षा कवच भेदून अमेरिका आणि इस्रायलने खामेनींना गाठलं कसं?” या ऑपरेशनची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात असली तरी, सोशल मीडिया आणि पाश्चात्य माध्यमांमध्ये अशा काही थिअरीज समोर येत आहेत ज्या एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकतील. मोसाद आणि सीआयएच्या या संयुक्त कारवाईत तंत्रज्ञानाचा आणि मानवी हेरगिरीचा असा वापर करण्यात आला आहे, ज्याने इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत.
04 Mar 2026 12:40 PM (IST)
मुंबई लोकलमधील प्रवास म्हणजे दररोजची धावपळ, गर्दी आणि वेळेशी चाललेली स्पर्धा. या गर्दीत अनेक महिला आत्मविश्वासाने प्रवास करतात. मात्र, कधी कधी असुरक्षिततेची भावना डोकावते. अशा वेळी मदतीसाठी आता दूर कुठे शोध घ्यावा लागणार नाही. कारण लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातातच आता ‘पॅनिक बटण’ असणार आहे. याबाबतचे सादरीकरण मध्य रेल्वेच्या नव्या महाव्यवस्थापकांसमोर सादर केले जाईल आणि त्यानंतरच ही नवी सुविधा महिलांच्या हातात देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने महिला सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी ‘यात्री’ मोबाईल अॅपमध्ये ‘एसओएस’ फौचर उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्यात आणली आहे.
04 Mar 2026 12:35 PM (IST)
कंपनीने लाँच केलेल्या या पावरफुल डिव्हाईसमध्ये अॅपलचे सेंटर स्टेज आणि डेस्क व्यू सपोर्टसह 12-मेगापिक्सेलचा वेबकॅम देण्यात आला आहे. हे डिव्हाईस दोन डिस्प्ले आकारात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस मॅकबुक प्रो मॉडेलची प्री ऑर्डर सुरु होणार असल्याचे सांगितलं जात आहे.
04 Mar 2026 12:30 PM (IST)
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले साहित्यिक, नाटककार, संगीतकार आणि चित्रकार असलेले ज्योतीन्द्रनाथ टागोर यांनी आजच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. ते रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू होते. बंगालमधील पुनरुत्थान चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. त्यांनी अनेक नाटके, गीते आणि साहित्यकृती निर्माण केल्या. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीव, देशभक्ती आणि कलात्मकता यांचे सुंदर मिश्रण दिसून येते. संगीत आणि चित्रकलेतही त्यांनी आपली स्वतंत्र छाप सोडली. त्यांच्या कार्यामुळे पुढील पिढ्यांना सर्जनशीलतेची दिशा मिळाली.
04 Mar 2026 12:28 PM (IST)
रामदास आठवले
विनोद तावडे
माया चिंतामण ईवनाते
रामराव वडकुते
04 Mar 2026 12:25 PM (IST)
पश्चिम आशियातील युद्धाने आता रौद्र रुप धारण केले आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने वार सुरु आहे. इराणने अमेरिकेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे, तर अमेरिका-इस्रायलनेही मोठा पलटवार सुरुच ठेवला आहे.
04 Mar 2026 12:20 PM (IST)
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भवतींची हिमोग्लोबीन पातळी तपासून त्यांच्या रक्तवाढीसाठी लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे, त्याचा राज्यातील गर्भवती महिलांना मोठा लाभहोणार आहे. देशात एकूण गर्भवतींपैकी सुमारे ५२ टक्के महिला रक्तक्षयाने ग्रस्त आढळून येतात. रक्तक्षयामुळे मातेच्या आरोग्यावर व प्रसूतीवर गंभीर परिणाम दिसून येतात. अनेक वेळा माता अथवा बालमृत्यूचे हे महत्त्वाचे कारण ठरते, असे आढळून आले आहे.
04 Mar 2026 12:15 PM (IST)
केंद्र सरकारने गाढव किंवा घोडेपालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत अनुदानाची योजना आणली आहे. देशभरात गाढवांची संख्या झपाट्याने कमी असल्याने केंद्र सरकारने या योजनेत गाढवांचा देखील समावेश केला आहे.
04 Mar 2026 12:10 PM (IST)
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या यूजर्ससाठी आतापर्यंत अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि फ्री एसएमएसचे फायदे ऑफर केले जातात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे देखील काही रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, जे त्यांच्या यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करतात. तर असे देखील काही प्लॅन्स आहेत, जे थेट वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करतात.
04 Mar 2026 12:00 PM (IST)
भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. एचडीएफसी बँकेच्या ताज्या अहवालात देशाच्या आर्थिक स्थितीविषयी उत्साहवर्धक आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या अहवालानुसार भारताचा विकास दर २०२६ या आर्थिक वर्षात ७.८ टक्के आणि २०२७ या आर्थिक वर्षात ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की जागतिक आव्हाने असूनही, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. देशातील खाजगी वापर वेगाने वाढत आहे, आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत ८.७टक्के पर्यंत पोहोचला आहे.