Russia’s Massive Earthquake: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ एक मोठा भूकंप झाला. जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि त्याचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १० किलोमीटर खाली होते.
त्याच वेळी, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि त्याची खोली ३९.५ किलोमीटर होती. जरी आकडेवारीत थोडा फरक असला तरी, दोन्ही एजन्सींनी तो खोल आणि शक्तिशाली भूकंप मानला. भूकंपानंतर, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने संभाव्य त्सुनामीचा इशारा जारी केला आणि इशारा दिला की या प्रदेशात धोका असू शकतो.
रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात जवळजवळ ६०० वर्षांच्या विश्रांतीनंतर क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा ३ ऑगस्ट २०२५ रोजी उद्रेक झाला. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, ३० जुलै रोजी झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर हा उद्रेक घडला. शास्त्रज्ञांनी या भूकंपाला ज्वालामुखीच्या क्रियाकलापांचा संभाव्य उत्प्रेरक मानले आहे.
स्फोटानंतर राखेचे ढग सुमारे ६ किलोमीटर उंचीवर गेले. मात्र हा स्फोट लोकवस्तीपासून दूर, क्रोनोत्स्की निसर्ग अभयारण्यात झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तज्ञांच्या मते, भूकंपामुळे मॅग्माचा प्रवाह आणि दाब यामध्ये बदल झाला आणि त्यामुळेच ज्वालामुखी सक्रिय झाला. अंदाजे १५५० नंतर या ज्वालामुखीचा हा पहिलाच उद्रेक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
पॅसिफिक त्सुनामी केंद्राने याबाबत सुचना जारी केली आहे. आज पहाटे झालेल्या भूकंपानंतर या भागात पुन्हा एकदा त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. संभाव्य त्सुनामीच्या धोक्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असंही सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे, कामचटकाच्या नैऋत्येस स्थित असलेल्या जपानने त्सुनामीचा इशारा अद्याप जारी करण्यात आलेला नाही. जुलैमध्ये आलेल्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर जपानमधील सुमारे २० लाख लोकांनी किनारी भागातून स्थलांतर केले आहे. जुलैमध्ये कामचटका प्रदेशात ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आला होता. त्यानंतर जपान, अमेरिका आणि पॅसिफिक महासागरातील अनेक बेट देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने जुलैमध्ये आलेल्या भूकंपाला गेल्या १४ वर्षांतील जगातील सर्वात शक्तिशाली आणि आतापर्यंतचा सहावा सर्वात शक्तिशाली भूकंप म्हटले आहे.
२०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर जुलैमध्ये आलेला भूकंप सर्वात शक्तिशाली होता. २००१ च्या भूकंपानंतर विनाशकारी त्सुनामी आली ज्यामुळे मोठा नाश झाला. रशियाचा कामचटका द्वीपकल्प अत्यंत सक्रिय भूकंपाच्या क्षेत्रात आहे. १९५२ मध्ये येथे ९.० रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला, जो आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक होता.