मिठाचे अतिसेवन केल्यामुळे शरीरावर दिसून येतात 'हे' दुष्परिणाम
जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मीठ. मीठाशिवाय पदार्थाची चव वाढत नाही. स्वयंपाक घरात इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नसले तरीसुद्धा मीठ हे असतंच. मिठाशिवाय पदार्थाला अजिबात चव लागत नाही. सर्वच पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात मीठ वापरले जाते. पण काहींना खूप जास्त मीठ लागते. जेवणात कितीही मीठ टाकले तरीसुद्धा त्यांना मीठ कमीच वाटते. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे मीठ उपलब्ध आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
‘ही’ एक वस्तू नैसर्गिक ब्रश आहे; आठवड्यातून दोनदा तरी याने दात घासायलाच पाहिजे
काहींना खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. जेवणात मीठ टाकल्यानंतर सुद्धा काहींना मीठ कमीच वाटते. हे केवळ तोंडाच्या चवीमुळे नाही तर आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांचे संकेत सुद्धा असू शकतात. गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. मीठ खाल्यामुळे शरीराच्या संवेदनशीलतेवर परिणाम दिसून येतो. अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे शरीरात जास्तीचे पाणी साचून राहते. यामुळे अंगाला सूज येणे, अतिरिक्त वजन वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता असते.
शरीरात सोडियमचे प्रमाण कमी झाल्यानंतर तर काही वेळा मानसिक ताण, थकवा, हार्मोनल बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे आहारात मीठ जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते. सुरुवातीला या सवयी अतिशय सामान्य वाटतात. पण कालांतराने शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात मीठ खावे. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात.आहारात खाल्ले जाणारे मीठ आरोग्यासाठी जितके चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे आहारात आवश्यकता असेल तेवढेच मीठ खावे.
दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?
मीठ म्हणजे काय?
मीठ हे एक खनिजाचे नैसर्गिक स्फटिक रूप आहे, जे प्रामुख्याने सोडियम क्लोराईड पासून बनते.हे एक रासायनिक दृष्ट्या लवण (salt) आहे आणि जगभरातील अनेक समाजांमध्ये अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी वापरले जाते.
मिठाचे प्रकार:
टेबल सॉल्ट, समुद्री मीठ, सैंधव मीठ, काळे मीठ इत्यादी मिठाचे प्रकार आहेत.
मिठाच्या सेवनाचे तोटे?
जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्यास मेंदूला हानी पोहोचू शकते.