Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना १२ चुकीचे मृतदेह सोपवले, तपासात मोठा खुलासा

Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेहसंदर्भात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ब्रिटिश कुटुंबांना मृतदेह मिळाले मृतदेह चुकीचं आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2025 | 05:40 PM
एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना १२ चुकीचे मृतदेह सोपवले, तपासात मोठा खुलासा (फोटो सौजन्य-X)

एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना १२ चुकीचे मृतदेह सोपवले, तपासात मोठा खुलासा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Air India Plane Crash News Marathi : जरा विचार करा… जेव्हा जवळच्या व्यक्तीला शेवटचं बघण्यासाठी शवपेटी उघडाल आणि त्या शवपेटीमध्ये दुसऱ्याचं मृतदेह असेल तर.. त्यावेळी पायाखालची जमीन निसटून जाईल… असं काहीस अहमदाबाद एअर इंडिया अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबासोबत घडलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद एअर इंडिया अपघातात जीव गमावलेल्यांच्या मृतदेहांबाबत झालेल्या चुकीमुळे ब्रिटनमधील दोन कुटुंबांचे दुःख आणखी वाढले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यात झालेल्या मोठ्या चुकीमुळे आधीच धक्क्यात असलेल्या मृतांच्या नातेवाईकांना त्याचा फटका सहन करावा लागला. आता मृतांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाकडून अधिकृतपणे कोणतीही माफी मागितली गेलेली नाही, परंतु चौकशी सुरू केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

संतापजनक! ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण; वाशिंक वादातून हल्ला घडल्याचा संशय

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचलेले नाहीत. पाठवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेह बदलण्यात आले आहेत. लंडनमधील पीडित कुटुंबांचे काम पाहणाऱ्या वकिलांनी हे उघड केले आहे. त्यांचा दावा आहे की जेव्हा हे मृतदेह लंडनमध्ये तपासले गेले तेव्हा ते दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले. या प्रकरणात एअर इंडियाकडून आतापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, ज्यामध्ये क्रू मेंबर्स आणि इतरांसह २६९ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले. त्यानंतर, डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते मृत कुटुंबियांकडे पाठवण्यात आले. लंडनमध्ये या मृतदेहांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपास अधिकाऱ्याने डीएनए मॅच केल्यावर ते मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले. एक-दोन नव्हे तर १२ मृतदेहांसोबत हे घडले. तपासात मृतदेह बदलण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर, अनेक कुटुंबांना त्यांचे अंत्यसंस्कार रद्द करावे लागले.

१२ मृतदेहांचे अवशेष परत पाठवण्यात आले

अपघातातील बळींच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे वकील जेम्स हीली प्रॅट यांनी डेली मेलला सांगितले की, किमान १२ ब्रिटिश नागरिकांच्या मृतदेहांचे अवशेष परत पाठवण्यात आले आहेत. एका महिन्यापासून या ब्रिटिश कुटुंबांच्या घरी बसलो आहे, या लोकांना फक्त त्यांच्या व्यक्तीचे मृतदेह परत हवे आहेत. यापैकी अनेक लोकांना अद्याप त्यांच्या प्रियजनांचे अवशेष मिळालेले नाहीत, काही लोकांना मृतदेहही मिळाले आहेत पण ते त्यांच्या सदस्यांचे नाहीत. जेम्स म्हणाले की ही एक मोठी निष्काळजीपणा आहे, ज्यासाठी या कुटुंबांना स्पष्टीकरण मिळायला हवे.

हे असे उघड झाले

ब्रिटिश कुटुंबांपर्यंत पोहोचणारे चुकीचे मृतदेह उघड झाले जेव्हा पश्चिम लंडनच्या वरिष्ठ कोरोनर डॉ. फियोना विल्कॉक्स यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या डीएनएशी जुळवून त्यांची ओळख पडताळण्याचा प्रयत्न केला. वकील हीली यांच्या मते, या तपासात मृतदेह चुकीचे असल्याचे उघड झाले, परंतु प्रश्न असा निर्माण होतो की जर हे या कुटुंबांचे नातेवाईक नसतील तर हे अवशेष कोणाचे आहेत. हे प्रकरण खूप मोठे आहे आणि ज्याला मृतदेहांचे अवशेष देण्यात आले आहेत ते चुकीचे आहेत का? त्यांनी आशा व्यक्त केली की ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर हे ब्रिटिश दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा मुद्दा नक्कीच उपस्थित करतील.

एका शवपेटीत दोन व्यक्तींचे अवशेष

आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की एकाच शवपेटीत एकापेक्षा जास्त व्यक्तींचे अवशेष ठेवण्यात आले होते, त्यांना अंतिम संस्कारापूर्वी वेगळे करावे लागले होते, ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे त्यापैकी अनेकांना त्यांच्या धर्मानुसार दफन करण्यात आले आहे.

प्लास्टिकच्या डब्यात अवशेष सापडले

एअर इंडिया विमान अपघात इतका भयानक होता की मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. तज्ज्ञांच्या मते, इमारतीला धडकल्यानंतर विमान आगीचा गोळा बनले ज्याचे तापमान १५०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळाले. नंतर, त्यांच्या मृतदेह सर्व कुटुंबांना सोपवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. अनेक कुटुंबांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये त्यांचे मृतदेह आढळले आहे.

कोण आहेत तुलसी गेबार्ड? डोनाल्ड ट्रम्पने चारचौघात म्हटले, ‘Hottest In The Room’, एकेकाळी होती शत्रू आणि आता…

Web Title: Ahmedabad plane crash air india wrong bodies give british victim family dna mismatch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Ahmedabad plane crash
  • air india

संबंधित बातम्या

Tula Na Kale: अजिंक्य राऊतचं नवीन प्रेमगीत ‘तुला ना कळे’ प्रदर्शित; सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा
1

Tula Na Kale: अजिंक्य राऊतचं नवीन प्रेमगीत ‘तुला ना कळे’ प्रदर्शित; सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा

आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध
2

आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.