संतापजनक! ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण; वाशिंक वादातून हल्ला घडल्याचा संशय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनाबेरा : एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
द ऑस्ट्रेलिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात शनिवारी (२० जुलै) ही घटना घडली. चरणप्रीत सिंग आपल्या बायकोसोबत शहराच्या लाईट शो पाहण्यासाठी गेला होता. या वेळी पार्किंगमध्ये त्याच्यावर रात्री ९ च्या सुमारास हल्ला करण्यात आला. कार पार्किंगवरुन स्थानिकांशी वाद झाला होता.
यावादातून त्याच्यावर तीव्र हल्ला करण्यात आला. चरणप्रीतला वांशिक शिवीगाळ करण्यात आले, तसेच बेदम मारहाणही करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी त्याला भारतात पळून जाण्यास सांगितले. त्याला लाथा बुक्क्यांनी मारले. चरणप्रीतने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु, लोकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारले.
सध्या या प्रकरणावर चरणप्रीत सिंग च्या कुटुंबियांनी एफआयआर दाखल केली आहे. यासंबंधी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पाच हल्लेखोर चरणप्रीतला मारताना दिसत आहे. हल्लेखारोंचा हातात धारदार शस्त्रे देखील दिसत आहे.
चरणप्रीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनफिल्डिमध्ये प्रकरणाशी संबंधित एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. बाकी आरोपींचा सध्या शोध सुरु आहे.
‘F— off, Indian’: Charanpreet Singh hospitalised after alleged racist attack in Adelaide
Indian international Charanpreet Singh was reportedly attacked by a group of five men wielding metal knuckles or sharp objects. One man has been arrested, while police continue searching for… pic.twitter.com/5BRDUXX1Jv
— The Australia Today (@TheAusToday) July 23, 2025
सध्या या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांनी चरणप्रीतच्या समर्थनार्थ आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा हल्ला वाशिंक वादातून घडला असल्याचे सांगितले जात आहे.