Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका बनवत आहे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली विनाशकारी शस्त्र, कोण आहे लक्ष्य?

जगाला अण्वस्त्र उत्पादनाविरोधात धडा देणाऱ्या अमेरिकेने स्वतःच विनाशकारी अणुबॉम्ब तयार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासन (NNSA) ने यासंदर्भात पुष्टी दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 10, 2025 | 12:43 PM
America is developing a weapon 24 times more powerful than the Hiroshima bomb

America is developing a weapon 24 times more powerful than the Hiroshima bomb

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : जगाला अण्वस्त्र उत्पादनाविरोधात धडा देणाऱ्या अमेरिकेने स्वतःच विनाशकारी अणुबॉम्ब तयार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासन (NNSA) ने यासंदर्भात पुष्टी दिली असून, B61-13 हा अत्यंत शक्तिशाली अणुबॉम्ब नियोजित वेळेच्या सात महिने आधी तयार होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. हा बॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा तब्बल २४ पट अधिक शक्तिशाली असून, त्याची क्षमता ३६० किलोटन असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा चीन आणि रशियासारखे देश अण्वस्त्र उत्पादनात झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे अमेरिका या शक्तींना प्रतिउत्तर देण्यासाठी नव्या प्रकारच्या अत्याधुनिक अणुबॉम्ब निर्मितीवर भर देत आहे. तथापि, या बॉम्बचे प्रत्यक्ष लक्ष्य कोण असेल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हिरोशिमा आणि नागासाकीवरील हल्ल्याच्या तुलनेत किती भयंकर?

१९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिका ने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अनुक्रमे १५ किलोटन आणि २५ किलोटन क्षमतेचे अणुबॉम्ब टाकले होते. या हल्ल्यांमुळे दोन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तर अनेक पिढ्यांवर त्याचा रेडिएशनचा परिणाम दिसून आला. B61-13 अणुबॉम्बची क्षमता ३६० किलोटन असल्यामुळे, तो हिरोशिमा बॉम्बच्या तुलनेत २४ पट अधिक विनाशकारी ठरू शकतो. यामुळे संपूर्ण शहर नष्ट होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम हजारो किलोमीटरपर्यंत जाणवू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारमधील भूकंपानंतर तज्ज्ञांनी भारतालाही दिला धोक्याचा इशारा; मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची शक्यता

US starts work on new nuclear bomb seven months ahead of schedule and it’s 24x more powerful than Hiroshima nuke… https://t.co/uTJX0Qyf2b pic.twitter.com/V0lfZGcuyO — Channel 1 Network News Worldwide (@C1Ntelevision) April 8, 2025

credit : social media

अमेरिकेचा अणुबॉम्ब कार्यक्रम वेळेआधी पूर्ण होणार

अमेरिकेच्या राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासन (NNSA) च्या अधिकाऱ्यांनी फॉक्स न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार, B61-13 प्रकल्प सुरुवातीला २०२३ मध्ये बायडेन प्रशासनाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला होता. हा बॉम्ब सँडिया नॅशनल लॅबोरेटरीजमध्ये विकसित केला जात असून, लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी आणि अमेरिकन हवाई दल यांच्यातील सहकार्याने तो तयार करण्यात येत आहे.

NNSA च्या प्रवक्त्याने सांगितले की, “B61-13 हा अमेरिकेच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या सात प्रमुख आधुनिकीकरण योजनांपैकी एक आहे. हा बॉम्ब विशेषतः कठीण आणि मोठ्या क्षेत्रातील लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तयार केला जात आहे. अमेरिकेने B61-12 प्रकल्पातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन अणुबॉम्ब निर्मितीचा वेग वाढवला आहे.” २०२४ पर्यंत हे शस्त्र पूर्णतः तयार होईल आणि त्याचा तैनाती कार्यक्रम लवकरच निश्चित केला जाणार आहे.

अमेरिकेची दुटप्पी भूमिका?

अमेरिका एकीकडे अण्वस्त्र निर्मितीवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादते, तर दुसरीकडे स्वतः अत्यंत विनाशकारी शस्त्रे तयार करत आहे, हे जगभरातील तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

1. भारत आणि पाकिस्तानवर अमेरिकेने अण्वस्त्र चाचण्यांबाबत निर्बंध लादले होते.

2.उत्तर कोरियावरही अमेरिकेने अणुबॉम्ब निर्मितीसाठी कडक निर्बंध घातले आहेत.

3.इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिका सातत्याने आक्षेप घेत आहे आणि त्याला नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

मात्र, याच अमेरिकेने आता स्वतःच एका नव्या आणि अधिक विनाशकारी अणुबॉम्बची निर्मिती वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक शांततेसाठी ही गोष्ट धोकादायक ठरू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेचा खरा उद्देश काय?

अमेरिकेने अधिकृतपणे या नव्या अणुबॉम्बचे लक्ष्य जाहीर केलेले नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प चीन आणि रशियाच्या अण्वस्त्र शक्तीला उत्तर देण्यासाठी तयार केला जात आहे.

1)  २०२२ च्या अण्वस्त्र धोरण आढाव्यात असे नमूद करण्यात आले होते की चीन आणि रशिया वेगाने अण्वस्त्र क्षमता वाढवत आहेत.

2)  रशियाने अलीकडेच नवीन “सार्मत-II” आणि “पोसीडॉन” क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे, जी संपूर्ण अमेरिका उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहेत.

3)  चीन देखील सतत आपली अण्वस्त्र शक्ती वाढवत असून, त्याने २०३५ पर्यंत १५०० अण्वस्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

4)  या पार्श्वभूमीवर, B61-13 हा बॉम्ब चीन आणि रशियाला थेट प्रत्युत्तर देण्यासाठीच तयार केला जात आहे, असे आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन असो वा अमेरिका, दोघांनाही टॅरिफ वॉरमध्ये हवा आहे भारताचा पाठिंबा; कारण काय?

 जागतिक शांततेसाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेच्या B61-13 अणुबॉम्ब निर्मितीमुळे जागतिक स्थैर्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. एका बाजूला अमेरिका उत्तर कोरिया, इराण आणि भारत-पाकिस्तानसारख्या देशांवर अण्वस्त्र चाचण्यांसाठी निर्बंध लादते, तर दुसऱ्या बाजूला स्वतः अत्यंत विनाशकारी अण्वस्त्र बनवत आहे, ही विरोधाभासी भूमिका आहे. या नवीन अणुबॉम्बच्या निर्मितीमुळे अंतरराष्ट्रीय पातळीवर शस्त्रस्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. जर अमेरिका अशा प्रकारे अधिक विनाशकारी अण्वस्त्र विकसित करत राहिली, तर भविष्यात जागतिक शांततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

credit : social media and Youtube.com

Web Title: America is developing a weapon 24 times more powerful than the hiroshima bomb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • America
  • international news
  • Japan

संबंधित बातम्या

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
1

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
2

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल
3

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित
4

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.