Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

Chinese Army: या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या सशस्त्र दलांना दिलेल्या आभासी भाषणात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या कारवाईचा दुर्मिळ संदर्भ दिला आणि म्हटले की, 'गेले वर्ष असामान्य आणि खूप खास होते.'

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 26, 2026 | 03:15 PM
xi jinping chinese army purge 100 generals missing military readiness crisis

xi jinping chinese army purge 100 generals missing military readiness crisis

Follow Us
Follow Us:
  • लष्करी शुद्धीकरण
  • कमांड स्ट्रक्चर कोसळले
  • खर्च वाढला, पण ताकद घटली

100 Chinese generals missing report : जगातील सर्वात मोठे सैन्य दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये (PLA) सध्या कमालीची अस्वस्थता आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी आपल्याच सैन्याची ‘सफाई’ करण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही महिन्यांत चक्क १०० हून अधिक दिग्गज जनरल आणि कमांडर बेपत्ता झाले आहेत. लंडनस्थित ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (IISS) ने प्रसिद्ध केलेल्या ‘मिलिटरी बॅलन्स २०२६’ अहवालानुसार, या कारवाईमुळे चिनी सैन्याची कमांड स्ट्रक्चर (Command Structure) पूर्णपणे कोलमडली आहे.

शी जिनपिंग यांचा ‘क्रांतिकारी’ बदल की भीती?

या महिन्याच्या सुरुवातीला चिनी सशस्त्र दलांना संबोधित करताना शी जिनपिंग यांनी स्वतः या परिस्थितीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “गेले वर्ष आमच्यासाठी असामान्य आणि खूप खास होते.” जिनपिंग यांच्या मते, ही ‘भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई’ असून त्यांनी सैन्यात ‘क्रांतिकारी बदल’ घडवून आणले आहेत. मात्र, विश्लेषकांच्या मते, जिनपिंग यांना आपल्याच लष्करी अधिकाऱ्यांकडून उठावाची भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी एक-एक करून आपल्या विरोधकांना किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना बाजूला सारले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

शंभर जनरल गायब; लष्करी कंत्राटात मोठी फसवणूक

अहवालानुसार, चिनी सैन्यात निकृष्ट दर्जाची शस्त्रे खरेदी करणे, लष्करी कंत्राटांमध्ये अब्जावधींची फसवणूक करणे आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे संशयास्पद लोकांशी असलेले संबंध, या कारणांमुळे ही कारवाई केली जात आहे. जिनपिंग यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जाणारे झांग युक्सिया आणि हे वेइडोंग यांसारख्या बलाढ्य जनरलनाही अटक करून तुरुंगात धाडण्यात आले आहे. चीनच्या अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या सात सदस्यीय सेंट्रल मिलिटरी कमिशनमध्ये (CMC) आता केवळ दोनच सदस्य शिल्लक राहिले आहेत, ज्यामध्ये स्वतः जिनपिंग यांचा समावेश आहे.

What’s brewing in Beijing is mind-blowing!
Xi Jinping has purged out his entire military leadership!
China is convulsing from within. Reports of Zhang Youxia – the Vice Chairman of the Central Military Commission of the People’s Republic of China – and a slate of senior… pic.twitter.com/uKcRYr9s2m — Mahesh Jethmalani (@JethmalaniM) January 25, 2026

credit – social media and Twitter

युद्धक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह

एकीकडे चीन तैवानवर आक्रमण करण्याची भाषा करत आहे, तर दुसरीकडे त्यांचे सैन्य नेतृत्वहीन होत चालले आहे. IISS च्या अहवालानुसार, “जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाहीत, तोपर्यंत पीपल्स लिबरेशन आर्मी आपली पूर्ण ताकद दाखवू शकणार नाही.” रिक्त पदांमुळे सैन्याच्या प्रादेशिक थिएटर्स आणि अण्वस्त्र नियंत्रण विभागांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. भ्रष्टाचाराच्या या कारवाईमुळे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेलाही खीळ बसली असून, चिनी शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेवर आता जागतिक स्तरावर शंका उपस्थित केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इराणच्या उंबरठ्यावर उभं अमेरिकन ‘आरमारी’ वादळ; पण जनरल डॅनने ट्रम्पना दिली ‘अशी’ अनर्थाची सावटसूचना

आशियात चिनी दादागिरी कायम, पण धोके वाढले

अंतर्गत यादवी सुरू असतानाही चीन आपला लष्करी खर्च सातत्याने वाढवत आहे. २०२५ पर्यंत आशियातील एकूण संरक्षण खर्चात चीनचा वाटा ४४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तैवानभोवतीची लष्करी तैनाती आणि दक्षिण चीन समुद्रातील त्यांचे आक्रमक पाऊल राजनैतिक फायदा मिळवण्यासाठी सुरूच राहणार आहे. मात्र, ज्या सैन्याचे जनरलच सुरक्षित नाहीत, ते सैन्य प्रत्यक्ष युद्धात किती तग धरू शकेल, हा मोठा प्रश्न दक्षिण आशियाई देशांना आणि अमेरिकेला पडला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनमधील १०० जनरल बेपत्ता होण्याचे मुख्य कारण काय?

    Ans: लष्करी कंत्राटातील भ्रष्टाचार, निकृष्ट शस्त्रास्त्रांची खरेदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सत्तेला असलेला संभाव्य धोका यामुळे ही कारवाई केली जात असल्याचे मानले जाते.

  • Que: या कारवाईचा चिनी सैन्यावर काय परिणाम होईल?

    Ans: चिनी सैन्याच्या कमांड स्ट्रक्चरमध्ये मोठे खिंडार पडले असून, महत्त्वाच्या निर्णयांसाठी अनुभवी नेतृत्वाची कमतरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे त्यांची युद्धक्षमता कमी झाली आहे.

  • Que: शी जिनपिंग यांनी या कारवाईबद्दल काय म्हटले?

    Ans: जिनपिंग यांनी याला 'क्रांतिकारी बदल' म्हटले असून भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत हे वर्ष असामान्य असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Xi jinping chinese army purge 100 generals missing military readiness crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • army
  • China
  • international news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
2

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू
3

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral
4

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.