Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP-Japan Deal: योगींचा जपानमध्ये ‘धमाका’! उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यात ऐतिहासिक करार; ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती

Clean Energy Deal: उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांनी ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार केला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये प्रशिक्षण मिळेल आणि ही नवीन तंत्रज्ञान राज्यातील उद्योगांमध्ये लागू केली जाईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 26, 2026 | 02:18 PM
up japan green hydrogen deal yamanashi mou yogi adityanath student training

up japan green hydrogen deal yamanashi mou yogi adityanath student training

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक ऊर्जा करार
  • विद्यार्थ्यांना जागतिक संधी
  • गुंतवणुकीचा महापूर

UP-Japan Green Hydrogen agreement 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘नेट झिरो’ उत्सर्जनाच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी जपानमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेश आणि जपानमधील यामानाशी (Yamanashi) प्रीफेक्चर यांच्यात ‘ग्रीन हायड्रोजन’ (Green Hydrogen) तंत्रज्ञानाबाबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे उत्तर प्रदेश केवळ ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणार नाही, तर राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान शिकण्याची सुवर्णसंधीही मिळणार आहे.

जपानच्या तंत्रज्ञानाने उजळणार उत्तर प्रदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, त्यांनी यामानाशी येथे आयोजित एका भव्य गुंतवणूक रोड शोमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रगतीचे सादरीकरण केले. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन मानले जाते. या करारांतर्गत, यामानाशी प्रीफेक्चर उत्तर प्रदेशला हायड्रोजन उत्पादनासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ पुरवणार आहे. हे तंत्रज्ञान राज्यातील जड उद्योग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लागू केले जाईल, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल.

यूपीचे विद्यार्थी होणार ‘ग्लोबल एक्सपर्ट’

या कराराचा सर्वात मोठा फायदा उत्तर प्रदेशातील तरुण विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्यातील नामांकित तांत्रिक संस्थांमधील निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी जपानला पाठवले जाईल. हे विद्यार्थी जपानी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, साठवणूक आणि त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, याचे प्रगत प्रशिक्षण घेतील. भारतात परतल्यानंतर हे ‘युवा इंजिनिअर्स’ राज्यातील ऊर्जा क्रांतीचे नेतृत्व करतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

सक्रिय प्रशासन आणि आर्थिक झेप

जपानमधील गुंतवणूकदारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “उत्तर प्रदेशने आता ‘सक्रिय प्रशासन’ (Proactive Governance) मॉडेल स्वीकारले आहे. आम्ही केवळ समस्या सोडवत नाही, तर भविष्यातील आव्हानांसाठी आधीच सज्ज आहोत.” गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था आणि दरडोई उत्पन्न तिप्पट झाले आहे. २५ कोटी लोकसंख्या आणि सुपीक जमीन असलेला हा प्रदेश आता जगातील गुंतवणूकदारांसाठी ‘पसंतीचे गंतव्यस्थान’ बनला आहे.

#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath took a ride on the Maglev train in Yamanashi, Japan. pic.twitter.com/0qE9MlIWSS — ANI (@ANI) February 26, 2026

credit – social media and Twitter

रोबोटिक्स आणि भविष्यातील गुंतवणूक

ग्रीन हायड्रोजन व्यतिरिक्त, उत्तर प्रदेश सरकार रोबोटिक्स (Robotics) क्षेत्रातही मोठी झेप घेत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात तरुणांना सक्षम करण्यासाठी राज्यात रोबोटिक्ससाठी समर्पित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात आधीच करण्यात आली आहे. जपानी कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असून, आगामी काळात उत्तर प्रदेश हे भारतातील रोबोटिक्स आणि एआय (AI) चे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IndiaAtUN: ‘पाकिस्तानच्या कर्जापेक्षा काश्मीरचं बजेट मोठं’, UNHRC मध्ये भारताच्या कन्येने पाकला धुतले; ‘हा’ VIRAL VIDEO एकदा पहाच

भारत-जपान मैत्रीचे नवे पर्व

डिसेंबर २०२४ मध्ये यामानाशीच्या राज्यपालांनी उत्तर प्रदेशला भेट दिली होती, तेव्हापासून या सहकार्याची पायाभरणी सुरू होती. आता मुख्यमंत्र्यांच्या जपान भेटीने या चर्चेला ठोस स्वरूपाचा करार प्राप्त झाला आहे. या भागीदारीमुळे केवळ उत्तर प्रदेशचा विकास होणार नाही, तर भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंधही एका नवीन उंचीवर पोहोचतील. स्वच्छ ऊर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हे मिलन उत्तर प्रदेशला ‘१ ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेकडे नेणारा महामार्ग ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यातील कराराचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाचा विकास करणे, राज्यातील उद्योगांमध्ये त्याचा वापर करणे आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात जपानमध्ये प्रगत प्रशिक्षण देणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.

  • Que: या करारामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?

    Ans: यूपीतील उच्च तांत्रिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना जपानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल, जिथे ते प्रत्यक्ष जपानी तज्ज्ञांकडून हायड्रोजन ऊर्जा निर्मितीचे तंत्र शिकतील.

  • Que: रोबोटिक्सच्या क्षेत्रात उत्तर प्रदेश सरकार काय पावले उचलत आहे?

    Ans: राज्यात रोबोटिक्सला प्रोत्साहन देण्यासाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन केले जात असून जपानी गुंतवणुकीद्वारे या क्षेत्रात संशोधन आणि रोजगार वाढवण्यावर भर दिला जात आहे.

Web Title: Up japan green hydrogen deal yamanashi mou yogi adityanath student training

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • international news
  • Japan
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप
1

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप

Uttar Pradesh : एकाच झाडाला लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह, भांगेत भरलं होतं कुंकु; परिसरात खळबळ
2

Uttar Pradesh : एकाच झाडाला लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह, भांगेत भरलं होतं कुंकु; परिसरात खळबळ

Tokyo School Fire: टोकियोत 4 मजली प्राथमिक शाळेला आग; 330 जणांची सुखरूप सुटका, 10 चिमुरडे जखमी
3

Tokyo School Fire: टोकियोत 4 मजली प्राथमिक शाळेला आग; 330 जणांची सुखरूप सुटका, 10 चिमुरडे जखमी

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?
4

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.