Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जर आमच्यावर हल्ला झाला तर अमेरिकन सैन्य…’, इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्पची खामेनेईंना सक्त Warning

US Threat to Iran : पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आणि कठोर इशारा दिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 15, 2025 | 12:51 PM
Attack us face unmatched retaliation donald trump warned iran

Attack us face unmatched retaliation donald trump warned iran

Follow Us
Close
Follow Us:

US Threat to Iran : पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आणि कठोर इशारा दिला आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेचा सहभाग नसतानाही, इराणकडून दिल्या गेलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “जर आमच्यावर कोणत्याही स्वरूपात हल्ला झाला, तर अमेरिकन सैन्य अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, जे इतिहासात कधीच पाहिले गेले नाही.”

ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वरून स्फोटक इशारा

शनिवारी ( दि 14 जून 2025 )  रात्री ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वरून ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, इस्रायलच्या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही थेट सहभाग नव्हता. त्यामुळे जर इराणने अमेरिकेला लक्ष्य केले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ट्रम्प यांनी इराण व इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी शांततेच्या कराराचा पर्याय सुचवला आणि लिहिले की, “आपण सहजपणे एक करार करू शकतो आणि या रक्तपाताला पूर्णविराम देऊ शकतो.” मात्र त्यांनी एकाच वेळी हा इशाराही दिला की, इराणने अमेरिकेच्या संयमाची चूक केली, तर त्याला जबर किंमत मोजावी लागेल.

इस्रायलचे ऑपरेशन ‘रायझिंग लायन’ – सलग तिसऱ्या दिवशी हल्ला

डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याच्या काही तास आधीच, शनिवारी रात्री इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत सलग तिसऱ्या दिवशी हा कारभार सुरू राहिला. या कारवाईत इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, अणुस्थळे आणि वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. तेहरानमधील अणुशक्ती कार्यक्रमाशी संबंधित तळांवर हल्ला केल्याची कबुली इस्रायली संरक्षण दलाने दिली आहे. यामुळे जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले, आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलने अवकाशातच पाडले इराणी क्षेपणास्त्र; ‘Arrow 3’ प्रणालीने जगाला केले चकित

इराणची तीव्र प्रतिक्रिया, अणु चर्चा रद्द

या हल्ल्यांनंतर इराणने त्वरित अमेरिकेसोबत ओमानमध्ये होणारी अणु चर्चा रद्द केली. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणला त्यांच्या अणु कार्यक्रमासंदर्भात अमेरिकेशी करार करण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी, इराणच्या क्रांती रक्षक दलाने दावा केला की, त्यांच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या ऊर्जा केंद्रांना आणि लढाऊ विमानांच्या इंधन निर्मितीच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. हे हल्ले इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून केल्याचा दावा करण्यात आला.

अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सला इराणचा खडा इशारा

या घडामोडींमध्ये आणखी एक गंभीर बाब म्हणजे इराणने अमेरिकेसह ब्रिटन व फ्रान्सला स्पष्ट इशारा दिला आहे. जर त्यांनी इस्रायलच्या बाजूने उभं राहत इराणी हल्ल्यांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे लष्करी तळ आणि नौदल जहाजे थेट लक्ष्य केली जातील, असा खळबळजनक इशारा दिला गेला आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावरून सुरू असलेला संघर्ष आता अधिक भयानक वळण घेण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, हे युद्ध फक्त इराण व इस्रायलपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते पश्चिम आशियात आण्विक तणावाची ठिणगी उडवू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेत ‘No Kings’चा गजर! ट्रम्प यांच्या वाढदिवसादिवशी देशभर निदर्शने, 350 कोटींच्या परेडवर टीका

 ट्रम्पचा इशारा, शांतता की संघर्ष?

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सडेतोड इशारा ही अमेरिकेच्या भविष्यातील धोरणाची झलक मानली जात आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सहभागी नसतानाही, इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याचा स्फोटक आणि विनाशकारी परिणाम होईल, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. हे वक्तव्य केवळ इराणसाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे – शांततेचा मार्ग स्वीकारा, अन्यथा युद्धाचा परिणाम कोणालाही परवडणारा ठरणार नाही.

Web Title: Attack us face unmatched retaliation donald trump warned iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Iran Vs Israel War: युद्धाचा भडका उडणार! इस्त्रायल इराणचा गेम करणार; ‘या’ धमकीने घाबरले खामेनी
1

Iran Vs Israel War: युद्धाचा भडका उडणार! इस्त्रायल इराणचा गेम करणार; ‘या’ धमकीने घाबरले खामेनी

SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर
2

SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर

पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार? बेंजामिन नेतन्याहूंचा गुप्त डाव उघड, इस्रायल-इराण युद्धावर सर्वात मोठा खुलासा
3

पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार? बेंजामिन नेतन्याहूंचा गुप्त डाव उघड, इस्रायल-इराण युद्धावर सर्वात मोठा खुलासा

आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य?
4

आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.