बांगलादेश : सध्या बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेवर आहे. सरकारविरोधी विद्यार्थी आंदोलनामुळे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आपले पद आणि देश सोडून भारतात आश्रय घेण्यासाठी यावे लागले. शेख हसीना जेव्हा बांगलादेशातून पळून भारतात आल्या, तेव्हा त्यांची राजकीय कारकीर्द संपल्याचे दिसत होते. हसीनावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
त्याचवेळी मोहम्मद युनूस यांच्या एका सल्लागाराने असेही सांगितले होते की, ते हसीना यांच्या पक्ष अवामी लीगला निवडणूक लढवण्यापासून रोखण्याच्या तयारीत आहेत. यानंतर बांगलादेशच्या न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या, जेणेकरून अवामी लीगला निवडणूक लढवण्यापासून कायदेशीररित्या रोखता येईल. मात्र, शेख हसिना यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, ‘अवामी लीगला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी कोणताही कायदेशीर अडथळा नाही.’
चक्क 16 वेळा सुर्योदय अन् सुर्यास्त; सुनिता विल्यम्सने शेअर केला नववर्षाचा खास अनुभव
बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नसीर उद्दीन यांनी म्हटले आहे की, सरकार किंवा न्यायपालिकेने बंदी घातल्याशिवाय पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष ‘अवामी लीग’ निवडणुकीत भाग घेऊ शकतो. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांनी चितगाव सर्किट हाऊस येथे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान ही माहिती दिली. निवडणूक आयोग पूर्ण स्वातंत्र्याने काम करत असून कोणत्याही बाह्य दबावाला सामोरे जात नाही, अशी ग्वाहीही नासिर उद्दीन यांनी दिली.
ते म्हणाले, ‘निष्ट आणि पारदर्शक निवडणुका व्हाव्यात यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ सीईसीने गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फसव्या मतदानाचा मुद्दा मान्य केला आणि मतदान प्रक्रियेवरील अविश्वासासाठी मतदार नोंदणीत घट झाल्याचे कारण दिले. या चिंता दूर करण्यासाठी त्यांनी लवकरच मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्याची घोषणा केली. नासिर उद्दीन म्हणाले, ‘मतदार यादी पुढील सहा महिन्यांत अद्ययावत केली जाईल. यावेळच्या निवडणुका पूर्वीच्या धर्तीवर होणार नाहीत. 5 ऑगस्टपासून, निवडणूकविषयक बाबींवर राष्ट्रीय सहमती वाढवण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.
नवीन वर्ष सुरु होताच जस्टिन ट्रुडोंचे बदलले तेवर; डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा म्हणाले
बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त नसीर उद्दीन यांनी मतदार यादी अद्ययावतीकरण आणि आगामी राष्ट्रीय निवडणुकांच्या तयारीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने म्हटले होते की, अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी मतदानाचे किमान वय 17 वर्षे ठेवण्याच्या सूचनेमुळे निवडणूक आयोगावर दबाव येईल आणि निवडणूक प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.
गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले, ज्याचे नेतृत्व 84 वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्याकडे सोपवण्यात आले. युनूस यांनी मतदारांचे किमान वय 17 वर्षे करावे, अशी सूचना केली आहे. 16 डिसेंबर रोजी विजय दिनानिमित्त आपल्या भाषणादरम्यान, मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशमध्ये 2026 पर्यंत सार्वत्रिक निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले होते.