Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधापदाचा राजीनामा का दिला?; ‘ही’ आहेत पाच कारणे

बांगलादेशात आरक्षणाबाबत सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा दिला. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत बांगलादेशात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 05, 2024 | 04:46 PM
शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधापदाचा राजीनामा का दिला?; ‘ही’ आहेत पाच कारणे
Follow Us
Close
Follow Us:

ढाका : बांगलादेशमधील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने  शेख हसीना यांनी  पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशही सोडला.  लष्कराच्या हॅलिकॉप्टरमधून त्या भारताकडे रवानाही झाल्या. मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली. लोक रस्त्यावर उतरले असून  हिंसाचार सुरू आहेत. सरकारी मालमत्ता जाळल्या जात आहेत.  त्यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पण शेख हसीना यांच्या राजीनाम्याची कारणेही तशीच आहेत.

1. आरक्षणाबाबत आंदोलन

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. पण काही दिवसातच या  आंदोलनाला हिंसक वळण लागले. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या ३० टक्के आरक्षणाचा वाद आहे. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला जात होता. तर सरकार आपल्या समर्थकांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहे.

2. विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध

आरक्षणाबाबत बांगलादेशात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विरोधी पक्षही आघाडीवर आले. शेख हसीना सरकारच्या विरोधात विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय जमवला आणि शेख हसीना यांच्या सत्तेलाच आव्हान दिले. विरोधकांनी हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  पण सरकारलाही विरोधकांचा सामना करण्यातही अपयश आले.

3. लष्कराने पाठिंबा दिला नाही

बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये लष्करानेही सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला. हिंसक आंदोलनात 90 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर बांगलादेश लष्कराने सांगितले की, आता ते आंदोलकांवर गोळीबार करणार नाहीत. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मुख्यालयात परिस्थितीवर चर्चा केली आणि घोषणा केली की आता आंदोलकांवर एकही गोळी चालवली जाणार नाही. या वक्तव्यानंतर लष्कराला आंदोलकांबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसून आले.

4. हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानचा हात

बांगलादेशात हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानचाही हात असल्याचा आरोप केला जात आहे. बांगलादेशच्या नागरी समाजाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयावर कट्टरपंथी विद्यार्थी आंदोलकाना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन पाकिस्तान बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या ‘मिशन पाकिस्तान’ जमातीशी संबंधित विद्यार्थी आंदोलकांच्या एका भागाशी पाकिस्तान संपर्कात असल्याचे काही अहवालातून समोर आले आहे.

5.बांगलादेशची आर्थिक स्थिती

बांगलादेशची आर्थिक स्थिती आधीच वाईट होती, पण या आंदोलनामुळे त्यात अधिकच भर पडली. तेथे बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना दीर्घकाळ सत्तेवर आहेत. अलीकडेच त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हापासून  बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आणि संतापाची भावनाही वाढील लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.

Web Title: Bangladesh violence live updates 5 reasons why sheikh hasina resigns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • sheikh hasina

संबंधित बातम्या

भारतात ‘गुपचूप’ कार्यालय उघडत आहे शेख हसीनाचा पक्ष? गुपित उघडं पडलं, युनूसवर भडकले नेता
1

भारतात ‘गुपचूप’ कार्यालय उघडत आहे शेख हसीनाचा पक्ष? गुपित उघडं पडलं, युनूसवर भडकले नेता

Bangladesh General election 2026 : बांगलादेशमध्ये उडणार निवडणुकीचा धुराळा; निवडणूक आयोग करणार मतदानाची तारीख जाहीर
2

Bangladesh General election 2026 : बांगलादेशमध्ये उडणार निवडणुकीचा धुराळा; निवडणूक आयोग करणार मतदानाची तारीख जाहीर

बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत
3

बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप; जनआंदोलनातील हिंसाचारात सामील असल्याचा ठपका
4

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप; जनआंदोलनातील हिंसाचारात सामील असल्याचा ठपका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.