Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या बिलावल भुट्टोची चांगलीच तंतरली; म्हणाला, ‘अणु हल्ल्याचा परिणाम…’

India Pakistan News : भारताविरुद्ध सतत जहरी वक्तव्य करणारे आणि अणुहल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो अखेर आपल्या शब्दांपासून मागे हटले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 22, 2025 | 12:28 PM
Bilawal Bhutto warned that nuclear war between India and Pakistan would be globally devastating

Bilawal Bhutto warned that nuclear war between India and Pakistan would be globally devastating

Follow Us
Close
Follow Us:

India Pakistan News : भारताविरुद्ध सतत जहरी वक्तव्य करणारे आणि अणुहल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो अखेर आपल्या शब्दांपासून मागे हटले आहेत. अलीकडेच त्यांनी कबूल केले की, भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्धाचे परिणाम या उपखंडापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतात. ही कबुली केवळ राजकीय ‘यूटर्न’ नाही, तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईनंतरचा मानसिक धक्का मानला जात आहे.

‘अणुयुद्धाच्या धमकीचे वास्तव आता कळले’

भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर बिलावल भुट्टोंनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “पाकिस्तानला या प्रदेशात शांतता हवी आहे. अणुयुद्ध झाले तर त्याचे परिणाम संपूर्ण क्षेत्राबाहेर जातील.” काही महिने पूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर जोरदार हल्ला केला होता. या घटनेनंतर बिलावल भुट्टोंनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती, परंतु आता त्यांच्या भूमिकेत बदल झाला असून, ते शांततेच्या गोष्टी करू लागले आहेत.

‘सिंधू आमची आहे, नाहीतर रक्त वाहेल’  धमकीचे रूपांतर संवादात

यापूर्वी सिंधू पाणी करार रद्द करण्याच्या भारताच्या संभाव्य निर्णयावर प्रतिक्रिया देताना, बिलावल भुट्टोंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले होते, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. आमचे पाणी त्यात वाहेल किंवा त्यांचे रक्त वाहेल.” मात्र आता त्याच भुट्टोंनी ‘संवादाची गरज’ असल्याचे सांगितले आहे. हे वर्तन पाकिस्तानच्या आतल्या अस्थिरतेचे आणि भारताच्या रणनीतिक दबावाचे स्पष्ट संकेत देते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगात सर्व शक्तिशाली असलेल्या अमेरिकेच्या ‘Minuteman-III’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाहा ‘हा’ चित्तथरारक VIDEO

भारताचे ऑपरेशन सिंदूर आणि जागतिक पातळीवरील मोहिम

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर अचूक आणि यशस्वी हल्ले केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचेही अनेक हवाई तळ आणि छावण्या उद्ध्वस्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे म्हटले की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. ऑपरेशन सिंदूर ही आता नवीन सामान्य बाब ठरणार आहे.” यानंतर भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचे पुरावे जागतिक समुदायासमोर मांडण्यासाठी ३३ देशांमध्ये ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जोरदार कारवाई केली असून, मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.”

पाकिस्तानची ‘दहशतवादाचा बळी’ अशी कुजबूज

या पार्श्वभूमीवर बिलावल भुट्टो यांनी माध्यमांसमोर सांगितले की, “पाकिस्तान हा स्वतः दहशतवादाचा सर्वात मोठा बळी आहे. आम्ही संवादाने तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात आहोत.” मात्र ही भूमिका पाकिस्तानच्या जुन्ह्या धोरणांना फाटा देणारी आहे. विशेषतः, अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या भुट्टोंनी अचानक शांततेचा पुरस्कार करण्यामागे, भारताच्या स्पष्ट आणि आक्रमक धोरणाचा प्रभाव दिसतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : व्हाईट हाऊसमध्ये वादाची ठिणगी; ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांच्यात बाचाबाची, VIDEO VIRAL

भारताचा दबाव, पाकिस्तानची माघार

बिलावल भुट्टोंचे नव्याने केलेले विधान म्हणजे भारताच्या निर्णायक लष्करी कारवायांनी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनयिक मोहिमांनी पाकिस्तानच्या आक्रमकतेला चाप बसवला आहे, याचे उदाहरण ठरते. जे बिलावल कालपर्यंत “रक्त वाहेल” म्हणत होते, ते आज “शांतता हवी” असे बोलू लागले आहेत. त्यामुळे भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची रणनिती केवळ लष्करी नव्हे तर राजनयिकदृष्ट्याही प्रभावी ठरल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Bilawal bhutto warned that nuclear war between india and pakistan would be globally devastating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
1

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.