जगात सर्व शक्तिशाली असलेल्या अमेरिकेच्या 'Minuteman-III' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाहा 'हा' चित्तथरारक VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Minuteman iii Nuclear Missile : अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक अत्यंत धोकादायक आणि प्रबळ अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून जागतिक सुरक्षेच्या समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राइक कमांडने २१ मे रोजी कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ‘मिनिटमॅन-III’ या आंतरखंडीय अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये इतकी प्रभावी आहेत की, चीनच्या संरक्षण यंत्रणांमध्ये चिंतेचे वारे पसरले आहेत. हे क्षेपणास्त्र ताशी तब्बल २४,००० किलोमीटर वेगाने अंतर कापण्यास सक्षम आहे आणि एकाच वेळी तीन वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करू शकते. यामुळे ते केवळ शक्तिशाली नव्हे तर रणनीतीच्या दृष्टीने अतिशय घातक सिद्ध होते.
‘मिनिटमॅन-III’ क्षेपणास्त्राचे संपूर्ण नाव LGM-30G Minuteman-III असे आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या त्रिस्तरीय आण्विक संरक्षण प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये स्थल, जल आणि आकाशातून अणुशस्त्र हल्ल्याची क्षमता सामावलेली आहे. या क्षेपणास्त्राची बांधणी बोईंग डिफेन्स या अमेरिकन कंपनीने केली असून, त्याच्या एका युनिटची किंमत सुमारे $७ दशलक्ष (सुमारे ₹५८ कोटी रुपये) आहे. मिनिटमॅन-III हे १०,००० किलोमीटर पर्यंतचा पल्ला असलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून, जगातील कोणत्याही देशावर अचूक अणु हल्ला करण्याची क्षमता या एकाच शस्त्रात आहे.
Completely unrelated I’m sure:
US tests Minuteman III intercontinental ballistic missile today.
The unarmed nuclear-capable weapon was fired from California to the Pacific. pic.twitter.com/I633QfzhCc
— 𝕋𝕙𝕖 𝔸𝕣𝕔𝕙𝕚𝕧𝕚𝕤𝕥 (@TheArchivistLC) May 22, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मोहिमेत घालणार ‘हे’ अनोखे घड्याळ; खासियत जाणून बसेल आश्चर्याचा धक्काच
या क्षेपणास्त्रात तीन स्वतंत्र सॉलिड प्रोपेलंट रॉकेट मोटर्स लावण्यात आल्या आहेत
पहिल्या टप्प्यात: ATK M55A1 इंजिन
दुसऱ्या टप्प्यात: ATK SR-19 इंजिन
तिसऱ्या टप्प्यात: ATK SR-73 इंजिन
ही इंजिन्स मिनिटमॅन-III ला प्रचंड वेग आणि लांब पल्ल्याची क्षमता देतात. यामुळे शत्रूच्या कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेला चुकवून हे क्षेपणास्त्र लक्ष्य गाठू शकते, असे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे.
या क्षेपणास्त्रात तीन स्वतंत्र अणुवॉरहेड्स बसवता येतात, जे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवर तडाखा देऊ शकतात. यामुळे एका प्रक्षेपणातून अनेक धोरणात्मक ठिकाणांचा नाश शक्य होतो, जे संभाव्य युद्धाच्या परिस्थितीत निर्णायक ठरू शकते.
अमेरिकेच्या या चाचणीला भौगोलिक दृष्टिकोनातून चीनच्या दिशेने स्पष्ट इशारा मानला जात आहे. दक्षिण चीन समुद्र, तैवान व अमेरिका-चीन दरम्यान सुरू असलेले तणाव यांच्याच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. तज्ञांच्या मते, मिनिटमॅन-III क्षेपणास्त्राची ही चाचणी केवळ अमेरिकेची ताकद दाखवण्यापुरती नाही, तर ती संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना मनोवैज्ञानिक दबावाखाली आणण्यासाठी एक स्पष्ट धोरणात्मक पाऊल आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानपेक्षा वाईट हाल होणार बांगलादेशचे? लष्करप्रमुखांच्या हातात देशाची सूत्र, युनूस हतबल
अमेरिकेच्या मिनिटमॅन-III क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी केवळ अमेरिकेच्या अणुशक्तीचा विस्तारच दर्शवत नाही, तर जागतिक पातळीवरच्या सुरक्षेच्या समीकरणांमध्येही मोठा भूकंप घडवून आणते. यामुळे अमेरिका अणुशक्तीच्या आघाडीवर अधिक ठामपणे उभी राहिली आहे, आणि चीनसह इतर संभाव्य विरोधकांसाठी हा एक गंभीर आणि थेट इशारा आहे. यामुळे येत्या काळात अमेरिका-चीन यांच्यातील सामरिक तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि त्यामुळे जागतिक संरक्षणाच्या समतोलावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.