
Top International Headlines Today
International breaking Live News Marathi : काही दिवसांपूर्वी ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तथापि, या बैठकीनंतर काही दिवसांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा अमेरिकेबद्दलचा दृष्टिकोन मऊ झाला आहे. झेलेन्स्की म्हणाले की आम्हाला अमेरिकेचे महत्त्व समजते आणि अमेरिकेकडून मिळणाऱ्या सर्व पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.दिवसभरातील सर्व अपडेट्स खाली वाचा…
03 Mar 2025 06:18 PM (IST)
इस्त्रायलच्या उत्तरी भागांत हैपा शहरात चाकूने लोकांनवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. हैफा शहरातील बस स्टॉपवर सोमवारी (03 मार्च) सकाळी हा हल्ला झाला. जखमींमध्ये एक महिला आणि 15 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेत हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर अरब-इस्त्रायली नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्लेखोराची हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
03 Mar 2025 06:06 PM (IST)
सध्या रशिया-युक्रेन युद्ध तीव्र झाले असून शांततेसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतून युरोपच्या 18 नेत्यांनी 02 मार्च रोज लंडनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. दोन दिवासांपूर्वी झालेल्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील वादानंतर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत युरोपियन नेत्यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर सहमती दर्शवली.
03 Mar 2025 05:34 PM (IST)
अमेरिकेच्या USAID कडून मिळणारी मदत बंद झाल्याने ट्रान्सजेंडर लोकांसाठी असलेले भारतीय क्लिनिक बंद झाले आहे. मित्रा क्लिनिक असे याचे नाव असून तीन शहरांमध्ये या सेवेचे कामकाज बंद झाले आहे. 2021मध्ये हैदराबादमध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. त्याच्या दोन शाखा पुणे आणि ठाण्यात स्थापन करण्यात आल्या. या क्लिनिकने हजारो ट्रान्सजेंडर लोकांना HIV,हार्मोन थेरपी आणि लिंग बदल प्रक्रियांबद्दल मार्गदर्शन सेवा पुरवल्या आहेत.
03 Mar 2025 05:07 PM (IST)
कॅनडाने आपल्या नवीन इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत. याचा थेट परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर आणि कामगारांवर होत आहे. फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या या नियमांमुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना अधिक अधिकार मिळाले आहेत. यामुळे अनेक विद्याध्यांचे परमिट रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन व्हिसा मिळवणेही कठीण झाले आहे. यामुळे भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
03 Mar 2025 03:07 PM (IST)
एकीकडे युक्रेन-रशिया युद्धाने भयंकर रुप धारण केले आहे, तर दुसरीकडे गाझामध्ये पुन्हा विनाशाचे नवे वादळ उभे राहिले आहे. इस्त्रायलने आज (03 मार्च) गाझावर बॉम्ब हल्ले केले आहेत. हमासने युद्धंबदीच्या दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिल्याने इस्त्रायलने हे हल्ले केले आहेत. इस्त्रायलने युद्ध करार तोडण्याची घोषणा केली असून गाझावर चारी बाजून हल्ला केला आहे. एवढेच नव्हे तर गाझाला मिळमारी मानवतावादी मदतही इस्त्रायलने बंदी केली आहे.
03 Mar 2025 03:02 PM (IST)
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. जपानी पंतप्रधान खूपच छान दिसत होते.
03 Mar 2025 01:35 PM (IST)
एकीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी वाद सुरु असताना ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी रशियाच्या विरोधात सुरु असलेल्या सायबर ऑपरेशन्सन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे संरत्रण मंत्री पीट हेगसेथ यांनी यासाठी सायबर कमांडला आदेश दिले आहेत. पेंटागॉनशी संबंधित एका गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे आदेश ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या भेटीपूर्वीच देण्यात आले होते.
03 Mar 2025 12:51 PM (IST)
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या मूत्रपिंडाशी संबंधित समस्या नियंत्रणात आल्या असून त्यांना श्वसनासाठी फिजिओथेरपी दिली जात आहे. तसेच व्हॅटिकनने जारी केलेल्या निवेदनुसार, रविवारी त्यांना (02 मार्च) व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले होते, मात्र याची गरज नव्हती. वेटिकनने म्हटले की, पोप न्यूमोनियाच्या आजारातून बरे होत आहेत. पोप फ्रान्सिस यांना अचानक ब्रोन्कियल स्पॅममुळे खोकल्याचा झटका आला होता, यामुळे त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता.
03 Mar 2025 12:22 PM (IST)
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्त्राय-जॉर्डन सीमेवर एका भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दावा करण्यात आला आहे की, या व्यक्तीने इस्त्रायली सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे त्याची हत्या करण्यात आली. ॲनी थॉमस गॅब्रिएल अशी या व्यक्तीची ओळख आहे. हा व्यक्ती केरळमधील थुंबाचा रहिवासी आहे. जॉर्डनमधूल भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. 10 फेब्रुवारी रोजी ॲनी थॉमसची हत्या करण्यात आली होती, असे जॉर्डन भारतीय दूतावासाने सांगितले.
03 Mar 2025 11:20 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून घोषित करत कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या 250 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. यापूर्वी अमेरिकेची कोणतीही अधिकृत भाषा नव्हती. देशातील स्थलांतरित आणि बहुभाषिक समाजात एकता आणण्याच्या उद्देशाने हे पाउल ट्रम्प यांनी उचलेले आहे.
03 Mar 2025 10:49 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या जोरदार वादविवादानंतर व्हाईट हाऊसमधून रिकाम्या हाताने परतलेले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना युरोपीय देशांच्या नेत्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ब्रिटन आणि फ्रान्स युक्रेनसोबत युद्धबंदी योजनेवर काम करण्यास पूर्णपणे तयार आहेत. युक्रेनला ५००० हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे दिली जातील असे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी सांगितले.
03 Mar 2025 10:49 AM (IST)
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स त्यांच्या कुटुंबासह सुट्ट्या साजरी करण्यासाठी व्हरमाँटला गेले होते जिथे त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्कीसोबत झालेल्या वादानंतर, लोकांनी व्हॅन्सविरुद्ध निदर्शने केली आणि युक्रेनच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. यासोबतच लोकांनी व्हॅन्सला पोस्टर्सही दाखवले. सुरक्षेच्या कारणास्तव व्हॅन्सला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.
03 Mar 2025 10:49 AM (IST)
मुलांचा डेटा गोपनीयता धोरण यूकेमध्ये, माहिती आयुक्त कार्यालयाने टिकटॉक, रेडिट आणि ऑनलाइन इमेज शेअरिंग वेबसाइट इमगुर मुलांच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करतात याची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिट आणि इमागुर यांचा वापर करणाऱ्या मुलांच्या वयाचे मूल्यांकन कसे केले जाते याची चौकशी केली जात आहे.