
फोटो सौजन्य सोशल मीडिया
तसेच आखातातील देश हे अरब असून इराणी लोक हे स्वतःला अरब मानत नाहीत. किंबहुना ते अरब नाहीतच त्यामुळे आखाती देश आणि इराण मध्ये धार्मिक गोष्टींवरूनही संघर्ष हा खूपच आधी पासून आहे . त्यातच आखाती देशांकडे अजून तरी पुरेसे आणि मोठे संरक्षण कवच नाही . उदा . आर्मी, नौसेना इत्यादी कारण इराण पासून वाचण्यासाठी म्हणा किंवा इराणवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या जागा अमेरिकेला सैनिकी स्थळ बनवण्यासाठी दिली आहे .
BRICS Summit : मोदींच्या गाला डिनरला जिनपिंग गैरहजर; ‘डिनर’ टाळल्याने चर्चांना उधाण!
विविध कारणामुळे आखाती देश आणि इराण यांच्यात वाद आहेत . यातच या दोन देशांची चर्चा होणे हे दोघांसाठीही फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे . पण BRICS मध्ये यूएई आणि इराण मध्ये चर्चा झाली या घटनेवर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प व्यक्त झालेत . त्यांनी मला फरक पडत नाही आखाती देशांनी इराणसोबत कधीही कुठेही बोलावं . हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे .
सुरवातीला व्हेनेझुएला सारखे आपण इराण दोन दिवसात शरण आणू असे वाटलेल्या अमेरिका आणि इस्रायलला इराणला अजून पर्यंत युद्धात हरवता आले नाही . जगातील २० % तेल वाहतूक ज्या सागरी रस्त्यावरून होते . होर्मूझ मधून त्यावर इराणचा ताबा असल्या कारणाने आखाती देशांना त्यांच्या तेलाच्या विक्रीसाठी मोठा अडथळा येत असून , हुतींच्या युद्धात सहभागामुळे त्यांनी लाल समुद्रातील वाहतूक यावर हल्ले करायला सुरवात केल्याने आखाती देश आणखीच संकटात आले .
दुसरीकडे मात्र अमेरिका अजून तरी इराणला कंट्रोल मध्ये आणत नसल्याचे पाहून आखाती देश आता स्वतःच इराण सोबत बोलून याबाबत मार्ग काढण्यावर पाऊले उचलत असल्याचे दिसत आहे . अशा राजकीय चर्चा सुरु आहेत . आता युद्ध बंध होऊन होर्मूझ खुला व्हावा जगाच्या गरजेबाबत ही आखाताची सुद्धा गरज झाली आहे .
ट्रम्प यांच्या वक्तव्याकडे पाहता , अमेरिका स्वतः प्रत्येक आखाती देशाच्या इराणसोबतच्या संवादात थेट हस्तक्षेप करणार नाही , असा संकेत मिळतो . दरम्यान BRICS परिषदेत इराण आणि UAE यांच्यातही उच्चस्तरीय चर्चा झाली आणि आखाती संघर्ष कमी करण्यासाठी नवीन मार्गावर भर देण्यात आला आहे .