
फोटो सौजन्य सोशल मीडिया
BRICS परिषदेत सहभागी झाले आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकही केली . मात्र त्यानंतर भारत मंडपम येथे झालेल्या विशेष गाला डिनरमध्ये ते सहभागी झाले नाहीत . त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय आणि राजनैतिक वर्तुळात चर्चाना सुरवात झाली आहे .
BRICS परिषदेदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यात महत्वाची चर्चा झाली . भारत – चीन संबंध , सीमावाद व्यापार आणि आर्थिक सहकार्य या मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला . दोन्ही देशांनी मतभेद व्यवस्थापित करत संबंध पुढे नेण्याची गरज व्यक्त केली . २०२० नंतर तणावपूर्ण झालेल्या भारत – चीन संबंधामध्ये मागील काही काळापासून सावधपणे सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु आहे .
Bangsamoro Elections : ५ दशकांचा रक्तपात, १.२० लाख बळी; आता मतपेटीतून नवा इतिहास!
गाला डिनरला जिनपिंग गैरहजर राहण्यामागचे अधिकृत कारण भारत किंवा चीनकडून जाहीर करण्यात आलेले नाही . मात्र सूत्रांच्या माहितीनुसार , दिवसभराच्या BRICS बैठका आणि मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर हॉटेलवर विश्रांतीसाठी परतले असावेत . त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा थेट राजनैतिक नाराजीशी संबंध जोडणे सध्या योग्य ठरणार नाही .
दरम्यान जिनपिंग यांच्यासोबत अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद झायेद अल नाहयान हे देखील डिनरला उपस्थित न्हवते . ते BRICS परिषदेनंतर यूएईला रवाना झाले होते . त्यामुळे जिनपिंग यांच्या अनुपस्थितीला एकट्याने राजनैतिक संकेत मानण्यापूर्वी इतर घटकही लक्षात घेणे महत्वाचे आहे .
Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली
पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या या गाला डिनरमध्ये BRICS देशांचे नेते , सहभागी देशांचे प्रतिनिधी आणि विविध आंतराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले . रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . डिनरमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच्या खास अनुभव देण्यासाठी पनीर लबाबदार , मिलेट पुलाव , खांडवी , खुंब गलौटी आणि शहतूत फिरणी यांसारखे पदार्थ ठेवण्यात आले होते .
जिनपिंग यांच्या डिनरमधील सहभाग नसणे चर्चेला विषय ठरले असले तरी त्यामागे राजनैतिक कारण असल्याचे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही . विशेष म्हणजे त्याच दिवशी मोदी जिनपिंग यांच्यात प्रत्यक्ष द्विपक्षीय चर्चा झाल्याने दोन्ही देशांमधील संवादाची प्रक्रिया सुरु असल्याचे चित्र आहे .