Bangladesh Hindu Violence: पुन्हा एकदा चिन्मय दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल
ढाका: बांगलादेशात पुन्हा एकदा चिन्मय कृष्ण दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चितगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून, या प्रकरणात 164 ओळखीच्या व्यक्तींसह 400 ते 500 अनोळखी लोकांवरही गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्य माहितीनुसार, उद्योगपती आणि हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेशचे कार्यकर्ते इनामूक यांंच्यावर दास समर्थकांनी हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. 26 नोव्हेंबर रोजी हा हल्ला करण्यात आला होता. इनामूक यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर न्यायालयाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. मोहम्मद अबू बकर सिद्दीकी यांनी दास आणि त्यांच्या समर्थकांविरोधात तक्रार दाखल केली होती.
हिंदूवरील हल्ले
पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी ढाका येथील ISKCON नमहट्टा मंदिरावर हल्ला करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि देवतांच्या मूर्त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. कोलकात्यातील ISKCON चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
राधारमण दास यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, कट्टरपंथीयांनी आधी मंदिराची छप्पर हटवली आणि नंतर मूर्त्यांना पेटवले. राधारमण दास यांनी याला हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराचे उदाहरण म्हणत गंभीर चिंता व्यक्त केली असून हे हल्ले थांबण्याची बांगलादेश सरकारकडे केली आहे.
जभरातून संतप्त प्रतिक्रीया
या घटनेनंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकन काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी दास यांच्या अटकेवर आणि हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी बांगलादेश सरकारला मानवाधिकार जपण्याचे, कायद्याचे संरक्षण देण्याचे आणि अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले.
हिंदूंवरील हल्ले जागतिक समुदायासाठीही चिंतेचे कारण
ढाकातील नमहट्टा मंदिरावर झालेला हल्ला हा केवळ ISKCON नव्हे तर एकूणच हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा कट असल्याचे मत हिंदू संघटनांनी मांडले आहे. हिंदू मंदिरांना लक्ष्य करणे, हिंदू धर्मगुरूंना अटक करणे आणि देशद्रोहाचे आरोप लावून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ISKCON सारख्या जागतिक संस्थांवर हल्ले होणे हे जागतिक समुदायासाठीही चिंतेचे कारण आहे. हिंदू संघटनांनी या घटनांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष देऊन बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची मागणी केली आहे.