पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला (Israel Hamas War) गेल्या 47 दिवस पुर्ण झाले आहे आहे. अजुनही इस्रायलने हमासवर हल्ले करणं थांबवलेलं नाही. या युद्धाची झळ संपुर्ण इस्रायलला बसली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला नरसंहार पाहता आता 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर (Israel Hamas War) अखेर युद्धविराम ( ceasefire ) झाला आहे. इस्रायली कॅबिनेटने चर्चेनंतर हमाससोबतच्या युद्धात युद्धविराम मंजूर केला आहे. त्या बदल्यात हमास ५० इस्रायली ओलीसांची सुटका करेल. तर, 50 ओलिसांच्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनी ओलिसांनाही सोडणार आहे.
[read_also content=”तुम्हालाही Instagram story ठेवयला आवडते, मग ‘ही’ बातमी आहे तुमच्यासाठी! https://www.navarashtra.com/india/instagram-story-will-be-appear-for-7-days-nrps-482655.html”]
इस्रायल सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, हमास येत्या 4 दिवसांत या 50 ओलीसांची सुटका करेल. इस्रायलचा हा हल्ला पूर्णपणे थांबेल. अहवालानुसार, हमास ज्या 50 ओलिसांची सुटका करणार आहे त्यामध्ये 30 मुले, 8 माता आणि 12 महिलांचा समावेश आहे. त्यांना 10 ते 12 च्या गटात सोडले जाईल.
50 ओलिसांच्या बदल्यात इस्रायल 150 पॅलेस्टिनी ओलिसांनाही सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या 150 पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेक पश्चिम किनारा आणि पूर्व जेरुसलेममधील रहिवासी आहेत. हे लोक इस्रायलच्या तुरुंगात बंद होते.
इस्रायली मंत्रिमंडळाने हमाससोबत ९६ तासांच्या युद्धविरामाला मान्यता दिली आहे. हल्ला सुरू झाल्यानंतर प्रथमच किमान चार दिवसांसाठी युद्धविरामावर सहमती झाली आहे. आता काही तासांत गाझामध्ये तोफांचे आणि लढाऊ विमानांचे आवाज थांबतील. अभूतपूर्व घडामोडीत इस्रायली कॅबिनेटने हमाससोबतच्या युद्धात युद्धविराम मंजूर केला आहे. 7 ऑक्टोब पासून सुरू झालेल्या या युद्धात इस्रायलमध्ये किमान 1,200 नागरिक आणि सैनिक मारले गेले. तर, इस्रायलमध्ये हमासच्या अतिरेक्यांच्या प्राणघातक हल्ल्यांनंतर, इस्रायलने प्रत्युत्तर दिले आणि गाझामझ्ये 11,000 हून अधिक लोक मारले गेले, असे हमास संचालित गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.