Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

Board of Peace : गाझाच्या पुनर्निमाणासाठी जागतिक निधी जमा करण्यास ट्रम्प यांनी सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी बोर्ड ऑफ पीस मंडळाची स्थापना केली असून याची पहिली बैठक लवकरच वॉशिंग्टन मध्ये होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 07:20 PM
Board of Peace

Board of Peace

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक वॉशिंग्टनमध्ये
  • गाझाच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक निधी गोळा करण्याचा हेतू
  • सौदी, तुर्कीसह या मुस्लिम देशांचा समावेश
Trump Gaza Board of Peace Meeting : वॉशिंग्टन : गाझाच्या पुनर्बांधणीसाठी पावले उचलण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी आधीच बोर्ड ऑफ पीस मंडळाची स्थापना केली असून याची पहिली अधिकृत बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक वॉशिंग्टनमध्ये पार पडणार आहे. यासाठी तारिखही निश्चित करण्यात आली आहे.

गाझा युद्धाचा शेवट होणार? ट्रम्प यांच्या Board of Peace मध्ये ८ मुस्लिम देशांची एन्ट्री; पुतिन देणार साथ?

गाझाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक योजना आखण्याचा उद्देश

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वॉशिंग्टन येथे गाझा (Gaza) बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकी सुमारे ३० देशांचा समावेश असणार असून ही एक आंतरराष्ट्रीय बैठक ठरणार आहे. याचा उद्देश गाझा पट्टीच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक आर्थिक मदतीची योजना आखण्याचा आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वत या बोर्ड ऑफ पीसचे अध्यक्ष असणार आहेत. या संघटनेच्या मदतीने गाझातील युद्धोत्तर परिस्थिती सुधारणे आहे. गाझात पायाभूत सुविधांची पुनर्बांघणी करणे आहे.

या मुस्लिम देशांचा समावेश

ट्रम्प यांच्या गाझा बोर्ड ऑफ पीसमध्ये आठ मुस्लिम देशांचा सहभागी होणार आहेत. सौदी अरेबिया, तुर्की , इजिप्त, जॉर्डन, इंडोनेशिया, पाकिस्तान , कतार आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी येणार आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या आदेशानुसार, हे मंडळ तयार करण्यात आले आहे.

या देशांनी दिला नकार

तर दुसरीकजे फ्रान्स, ब्रिटन, युक्रेन या देशांनी बोर्ड ऑफ पीस संघटनेत सामील होण्यास नकार दिला आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्रम्प यांनी रशियाला देखील या संघटनेत सहभागी होण्याची आमंत्रण पाठवले आहे. यामुळे युरोपीय देशांनी रशियाची उपस्थिती नाकराली आहे. तसेच ही संघटना संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेला कमजोर करु शकते अशी चिंता युरोपीय देशांनी व्यक्त केली आहे.

भारतालाही मिळाले आहे आमंत्रण

ट्रम्प यांनी भारताच्या सहभागाचीही इच्छा व्यक्त केली आहे. भारत इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा मित्र देश आहे. दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध असून बोर्ड ऑफ पीसमध्ये उपस्थिती ही मध्यपूर्वेत शांततेला हातभार लावू शकते. पण भारताने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भारताने केवळ ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला पाठिंबा दर्शवला आहे.

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: गाझा बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक कुठे आणि कधी होणार आहे?

    Ans: गाझा बोर्ड ऑफ पीसची पहिली बैठक वॉशिंग्टन येथे पार पडणार असून १९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.

  • Que: गाझा बोर्ड ऑफ पीसमध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे?

    Ans: सौदी अरेबिया, तुर्की , इजिप्त, जॉर्डन, इंडोनेशिया, पाकिस्तान, कतार आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे

  • Que: गाझा बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्यामागे ट्रम्प यांचे हेतू काय आहे?

    Ans: गाझा बोर्ड ऑफ पीस स्थापन करण्याचा हेतू गाझात युद्धोत्तर परिस्थिती सुधारणे, पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करणे असा ट्रम्प यांचा हेतू आहे.

Web Title: Will gaza transformed first meeting of trumps board of peace in washington

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gaza
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त
1

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
2

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
3

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
4

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.