Chaos erupts at Seoul Court fter arrest of South Korean president Yoon supporters protest demanding his release
सियोल: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना त्यांच्या महाभियोगानंतर रविवारी औपचारिकपणे अटक करण्यात आली. सियोल वेस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्यांच्या अटक वॉरंटला मंजुरी दिली. गेल्या महिन्यात मार्शल लॉ लागू करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि इतर अनियमितता यासंबंधी विविध आरोप होते. या घटनेनंतर महाभियोग प्रस्ताव लागू करण्यात आला. आणि काही दिवसांपूर्वी त्यांना राष्ट्रापती भवनमधून ताब्यात घेऊन आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधावरी ( दि. 15 जानेवारी) दक्षिण कोरियाच्या सुरक्षा दलाच्या सहकार्याने त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांच्या सुटकेसाठी विदी पथकाने कोर्टात याचिका दाखल केली. शनिवारी या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने पुरावे नष्ट होण्याचा धोका असल्यामुळे युन सुक यांना जामीन देण्यास नकार दिला आली अटक वॉरंटला मंजुरी दिली. एकीकडे, युनू सुक योल यांच्या अटकेनंतर पुढील 20 दिवसांसाठी त्यांना ताब्यात ठेवण्याची परनावगी मिळवण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी अधिकारी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, युन यांच्या वकीलांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची तयारी केली आहे.
न्यायालयाबाहेर गोंधळ
युन सुक योल यांना उइवांग येथील डिटेन्शन सेंटरमधून उच्च सुरक्षेसह सियोल जिल्हा न्यायालयात नेण्यात आले. दरम्यान, न्यायालयाच्या परिसराबाहेर मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरु होता. युन यांच्या समर्थक मोठ्या संख्येने जमलेले होते. राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेची मागणी करत मोठ्या प्रमाणात निदर्शने काढली. यावेळी पोलीस आणि समर्थकांमध्ये चकमक उडाली. काही आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या दिशेने जाण्यासाठी कुंपण चढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 20 आंदोलकांना अटक करण्यात आली. याशिवाय, भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांच्या दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळादरम्यान, 40 लोकांना पोलीस ताब्यात घेण्यात आले.
युन सुक योल यांच्यावर लवकरच पुढील सुनावणी होणार आहे. त्यांच्या अटकेमुळे देशात मोठे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रपती पदावरून हटवल्यानंतर आणि महाभियोगाचा सामना केल्यानंतर युन यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे, तर विरोधकांनी त्यांच्या अटकेला न्यायाचे उदाहरण मानले आहे. युन यांची सुटका होणार की त्यांच्या कारवाईचा आणखी विस्तार होणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
आंतरराष्ट्रीय प्रतिसाद
यून सुक येओल यांची अटक आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेत आहे. काही देशांनी याला दक्षिण कोरियाच्या लोकशाहीचा विजय म्हणून पाहिले आहे, तर काहींनी त्याची प्रतिक्रिया देशाच्या राजकीय स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मानली आहे. परंतु या घटनेने याच्याशी संबंधित असलेल्या अनेक नेत्यांसाठी आणि संस्थांसाठी संकट निर्माण केले आहे.