Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश

China-Taiwan : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानसोबतचे संबंध आणि सहकार्य वाढवत राष्ट्रीय एकत्रीकरणाच्या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तैवानवर तातडीच्या लष्करी कारवाईची घोषणा त्यांनी केलेली नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 30, 2026 | 09:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शी जिनपिंग यांचा तैवानबाबत स्पष्ट संदेश
  • तैवानची भूमिका काय?
  • चीन तैवानवर लष्करी कारवाई करणार?
China-Taiwan :चीन आणि तैवानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुन्हा एकदा तैवानसोबतच्या राष्ट्रीय एकत्रीकरणाचा मुद्दा पुढे केला आहे. चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात जिनपिंग यांनी तैवानसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तैवानचा प्रश्न हा चीनच्या राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्वाशी संबंधित असल्याची भूमिका बीजिंगकडून सातत्याने मांडली जाते.

शी जिनपिंग यांचा तैवानबाबत स्पष्ट संदेश

जिनपिंग यांनी तैवानच्या सामुद्रधुनीपलीकडील देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला. तसेच तैवानच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या शक्तींविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. बाह्य शक्तांचा हस्तक्षेप रोखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. चीनच्या मते, तैवानसोबतचे शांततापूर्ण संबंध विकसित करून राष्ट्रीय एकत्रीकरणाचे उद्दिष्ट पुढे नेणे आवश्यक आहे.

याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची भूमिका अमेरिकेने घ्यावी, असे म्हटले होते. चीनने तैवानच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले आहे. मात्र, या चर्चेत तैवानच्या मुद्द्यावर कोणताही मोठा ठोस करार झाल्याचे समोर आलेले नाही.

Airplane Fight : हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

तैवानची भूमिका काय?

तैवानमध्ये स्वतंत्र लोकशाही सरकार कार्यरत आहे आणि तैवानचे सरकार बीजिंगच्या सार्वभौमत्वाच्या दाव्याला मान्यता देत नाही. चीन मात्र तैवानला आपल्या भूभागाचा भाग मानतो. त्यामुळे तैवानचा प्रश्न हा केवळ चीन-तैवानमधील वाद राहिलेला नसून अमेरिका आणि आशिया-पॅसिफिकमधील सुरक्षेच्या समीकरणांशीही जोडला गेला आहे.

शी जिनपिंग यांच्या ताज्या वक्तव्यानंतर तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या भूमिकेला विरोध केला आहे. तैवानने बीजिंगकडून आपल्या राजकीय दाव्यांसाठी तथ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या तैवानविषयक धोरणात ट्रम्प-जिनपिंग भेटीनंतर मोठा बदल झाल्याचे स्पष्ट संकेत नसल्याचे तैवानकडून सांगण्यात आले आहे.

Breaking News : आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

चीन तैवानवर लष्करी कारवाई करणार?

जिनपिंग यांच्या ताज्या वक्तव्यामुळे चीन तैवानला ताब्यात घेणार का, असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, सध्याच्या वक्तव्यात त्यांनी तैवानवर तातडीने लष्करी कारवाई करण्याची घोषणा केलेली नाही. उलट, त्यांनी क्रॉस-स्ट्रेट संबंधांचा शांततापूर्ण विकास, देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवण्याचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी चीनने तैवानच्या स्वातंत्र्याला आणि बाह्य हस्तक्षेपाला विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

त्यामुळे चीन-तैवान प्रश्नावर पुढील काळात राजनैतिक दबाव, आर्थिक संबंध, लष्करी हालचाली आणि अमेरिका-चीन संबंध महत्त्वाचे ठरणार आहेत. जिनपिंग यांच्या ताज्या वक्तव्यामुळे चीनने तैवानच्या एकत्रीकरणाचा मुद्दा आपल्या राष्ट्रीय अजेंड्यावर कायम ठेवल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

 

 

Web Title: China taiwan will china take taiwan a message of progress towards integration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • China
  • Taiwan
  • Top Marathi News

संबंधित बातम्या

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक
1

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल
2

Indian Tourist in China Viral Video : चीनमध्ये गायीच्या पुतळ्यावर बीफचे तुकडे ; भारतीय पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल

Jensen Huang: 140 अब्ज डॉलरचे साम्राज्य धोक्यात? जेन्सन हुआंग परत येणार
3

Jensen Huang: 140 अब्ज डॉलरचे साम्राज्य धोक्यात? जेन्सन हुआंग परत येणार

World News : चीनच्या AI चिप्सवर ट्रम्प यांचे नवे निर्बंध; ऑनलाइन ॲक्सेस रोखण्याची तयारी
4

World News : चीनच्या AI चिप्सवर ट्रम्प यांचे नवे निर्बंध; ऑनलाइन ॲक्सेस रोखण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.