फोटो सौजन्य सोशल मीडिया
आता हे घडले कशामुळे रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरु आहे . दोन्ही ही देश एकमेकांवर तोडीसतोड हल्ले करत आहेत . दोन्ही देशात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आहे . दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांना पाण्यात पाहत आहेत . अशा सगळ्या रागाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनचे नागरिक असलेले पायलट एकच विमान उडवायला एकत्र आले . आणि त्यांच्यात संघर्ष सुरु झाला .
दोघांचीही देशभक्ती विमानातील प्रवाश्यांच्या जीवाशी आली . विमानात सगळ्या वयोगटाचे इस्रायली नागरिक जिवाच्या आकांताने ओरडू लागले . नंतर कॉकपीट मध्ये एकमेकांना मारून शांत झाल्यानंतर दोन्ही पायलटनी समजूतदारपणा दाखवत विमान सौदी अरेबियाच्या तबूक विमानतळावर विमान उतरवले . तेव्हा कुठे इस्रायलच्या प्रशासनाने आणि विमानातील प्रवाशांनी खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास टाकला .
या घटनेची माहिती समजताच इस्रायली प्रशासन आणि सरकार ताबडतोब कामाला लागले . लगेचच त्यांनी विमानातील एकूण एकाची माहिती घ्यायला सुरवात केली . विमानात कोणी महत्वाचा व्यक्ती आहे का याची शहनिशा करायला सुरवात केली . याच प्रक्रियेदरम्यान रशियन माध्यम Vedomosti ने इस्रायली N १२ च्या हवाल्याने दोन्ही पायलट अनुक्रमे रशियन आणि युक्रेनियन असल्याचे म्हंटले . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .
विमानातून हायजॅक चास संदेश मिळाल्यानंतर इस्रायलचे सरकार पटकन जागरूक झाले . त्यांनी विमानाच्या प्रत्येक अंगाकडे बारकाईने लक्ष ठेवायला सुरवात केली . कारण याआधीच्या इतिहासात इस्रायल सोबत असे खूप गोष्टी घडल्या आहेत . त्यात आत्ताची युद्धाची सुरु असलेली परिस्थिती बघता काहीही होऊ शकते या संभाव्याने या विमानाकडे त्याच्या हालचालीकडे पाहू जाऊ लागले . तेव्हा हे विमान तबुक या सौदी अरेबियाच्या एका विमानतळा उतरवणे शक्य असल्याचे माहितीत समोर आले . तेव्हा प्रशासनाने पटकन तसे आदेश देऊन विमान विमानतळावर उतरवण्यात आले . अशा आपत्कालीन वेळी उड्डाण रद्द करणे हाच चांगला मार्ग असल्याने हा पर्याय निवडण्यात आला . असे बोलले जाते आहे .
वैमानिकांचा विमानावरील ताबा सुटल्याने विमानाने गाठलेली एक विशिष्ठ उंची अचानक खालच्या पातळीवर यायला लागली . साधारण विमान आपली उंची कमी करत असताना ते पटकन खाली घेत नाहीत . पण इथे मात्र विमान सरळ तेजीने खाली येऊ लागल्याने गोंधळ उडाला . सगळ्यांचे ऑक्सिजन मास्क पटकन खाली आले . पण काही सेकंदाने वैमानिकांनी विमानावर नियंत्रण मिळवले आणि सुरक्षित लँडिंग केले .






