
China's 78,000-ton nuclear-safe floating island in the South China Sea worries neighboring countries
China Artificial Island : दक्षिण चीन समुद्रातील (South China Sea) घडामोडी पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधत आहेत. या वेळी कारण आहे चीनचे विशाल, अणुसुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक तरंगते कृत्रिम बेट(Nuclear-safe floating island). असून ते केवळ तरंगणारे व्यासपीठ नसून, चीनचे फिरते सामरिक शक्तिकेंद्र मानले जात आहे. या तरंगत्या तळावर २३८ व्यक्ती सलग चार महिने राहू शकतील आणि ते कुठल्याही समुद्री प्रदेशात तैनात करता येणार आहे. २०२८ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.
या प्रकल्पाचे वजन तब्बल ७८,००० टन असल्याचे सांगितले जात आहे. हे प्लेटफॉर्म अणुहल्ल्यालाही तोंड देऊ शकते, असा दावा चीनचा आहे. विशेष म्हणजे, या रचनेत २३८ कर्मचारी सलग चार महिने राहू शकतात, आणि ते कुठल्याही समुद्रभागात हलवता येण्याजोगे असेल. ही रचना आधुनिक रडार सिस्टम, कमांड सेंटर, अँटी-मिसाइल संरक्षण, हवामानरोधक मल्टी-लेयर्ड आर्मर आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनने सुसज्ज असेल. चीनचे सरकारी माध्यम सांगतात की, हे व्यासपीठ बुडवणे किंवा क्षेपणास्त्रांनी नष्ट करणे जवळपास अशक्य असेल.
या प्रकल्पाला हे नाव देण्यामागे चीनची वास्तविक रणनीती दडलेली आहे. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त पाण्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, चीन यापूर्वीच अनेक कृत्रिम बेटे बांधत आहे. आता तरंगते आणि अणु-प्रतिरोधक प्लॅटफॉर्म तयार करून चीन स्थिर नियंत्रणाऐवजी गतिशील आणि सैनिकी उपस्थिती वाढवत आहे. यामुळे व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. कारण चीनच्या हालचाली आता केवळ भूभागापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत त्या समुद्रामध्ये हलत्या सीमांमध्ये बदलत आहेत.
China achieves what US, France, and Russia failed to, building floating artificial island capable of withstanding nuclear attack#China #USA #France #Russia #nuclearattack #Beijing https://t.co/KUwAcO1wvO — India.com (@indiacom) November 21, 2025
credit : social media
दक्षिण चीन समुद्रातील विवादांमध्ये व्हिएतनाम हा चीनचा सर्वात जुना आणि सक्रिय प्रतिस्पर्धी मानला जातो. चीनने आधीच व्हिएतनामच्या तेल संशोधन मोहिमा थांबवल्या आणि त्याच्या जहाजांना आव्हान दिले होते. आता, हे नवीन प्लॅटफॉर्म व्हिएतनामच्या EEZ (Economic Exclusive Zone) जवळ फिरू लागल्यास ही परिस्थिती अधिक तीव्र होऊ शकते.
हे देखील वाचा : Tejas Jet Crash Explained : अपघातात दोष डिझाइनचा नव्हताच तर धोकादायक ‘G-maneuver’ ठरले कारण; समजून घ्या कसे ते?
व्हिएतनाम औपचारिकपणे कोणत्याही मोठ्या आघाडीत नसला तरी, चीनच्या या हालचालीमुळे तो आता अमेरिका, भारत आणि जपानसोबत संरक्षण सहकार्य वाढवत आहे. भारताने तर व्हिएतनामला ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली देण्याचा विचार सुरू केला आहे. ही घडामोड नक्कीच आग्नेय आशियातील सामरिक समीकरण पुन्हा आखत आहे.
तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे:
जर चीनने अशी अनेक तरंगती बेटे तैनात केली, तर दक्षिण चीन समुद्र कायमचा तणावाचा केंद्र बनेल.
या परिस्थितीत,
हे स्पष्ट आहे की, चीनची ही हालचाल केवळ अभियांत्रिकी कौशल्य नाही ती नवीन सामरिक शक्ती-राजकारणाची सुरुवात आहे. चीनचे “शकाल ऑफ द सी” हे एक इंजिनियरिंग वॉर मशीन आहे, जे संपूर्ण प्रदेशातील भू-राजकीय स्थिती बदलू शकते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दक्षिण चीन समुद्रातील स्पर्धा, सैन्यीकरण आणि संघर्षाच्या शक्यता अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Ans: अहवालानुसार हा प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित होऊ शकतो.
Ans: ते अणुहल्ला झेलू शकते, लष्करी बेस म्हणून फिरू शकते आणि 238 लोकांना चार महिने राहता येते.
Ans: मुख्यतः व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशिया चिंतेत आहेत.