Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुख्यात ड्रग माफिया ‘ El Mencho’ लष्करी कारवाईत ठार; मेक्सिकोमध्ये हिंसाचार, गँगस्टर्सचा रस्त्यावर राडा, पाहा थरारक VIDEO

Mexican Security Operation:सीजेएनजीचे प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा "एल मेंचो" हे लष्करी कारवाईत मारले गेले. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण मेक्सिकोमध्ये, विशेषतः जलिस्को आणि इतर राज्यांमध्ये हिंसाचार उसळला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 23, 2026 | 09:50 AM
mexican drug lord el mencho killed military operation violence jalisco

mexican drug lord el mencho killed military operation violence jalisco

Follow Us
Follow Us:
  • मोठ्या मोहिमेला यश
  • हिंसाचाराचा वणवा
  • दहशतीचा अंत

El Mencho dead Mexico military operation 2026 : जगातील सर्वात क्रूर आणि ‘वॉन्टेड’ ड्रग्ज तस्करांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ “एल मेंचो” (El Mencho) याचा लष्करी कारवाईत अंत झाला आहे. मेक्सिकोच्या (Mexico) संरक्षण मंत्रालयाने या ऐतिहासिक मोहिमेची माहिती दिली असून, या बातमीने संपूर्ण दक्षिण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. एल मेंचोच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्याच्या टोळीने मेक्सिकोच्या रस्त्यांवर हिंसाचाराचा तांडव सुरू केला आहे.

जलिस्कोच्या डोंगराळ भागात ‘ऑपरेशन क्लिनअप’

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकन सुरक्षा दलांना एल मेंचो जलिस्को राज्यातील तापलापा जवळच्या डोंगराळ भागात लपल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. लष्कराने या भागाला वेढा घातला असता दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. ५९ वर्षीय एल मेंचो या कारवाईत गंभीर जखमी झाला होता. त्याला हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात हलवत असतानाच जखमांच्या तीव्रतेमुळे त्याचा मृत्यू झाला. एल मेंचो हा ‘जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ (CJNG) चा प्रमुख होता, जी गेल्या दशकात मेक्सिकोमधील सर्वात शक्तिशाली आणि हिंसक गुन्हेगारी संघटना मानली जाते.

CJNG Cartel are burning buses and structures in Puerto Vallarta, Mexico. pic.twitter.com/14s24eqoli — Breaking911 (@Breaking911) February 22, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Tariff: ट्रम्पच्या टॅरिफ स्फोटाने 24 तासांत बदलले जगाचे अर्थकारण; पण भारतीय वंशाच्या वकिलांनी लावला कायद्याचा ‘असा’ सुरुंग

शहरे ओलीस, वाहनांची जाळपोळ आणि भीतीचे सावट

आपल्या लाडक्या म्होरक्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मेक्सिकोमधील जलिस्को, ग्वानाजुआटो, नायरिट आणि मिचोआकान या राज्यांमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. सीजेएनजीच्या सशस्त्र गुंडांनी रस्त्यावर उतरून सार्वजनिक बस, खासगी गाड्या आणि मालवाहू ट्रक्सना आग लावून रस्ते अडवले आहेत. ग्वाडालजारा सारख्या मोठ्या शहरांमध्ये लोकांनी दहशतीपोटी घरे सोडली असून सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मेक्सिकन सरकारने अनेक भागांत संचारबंदी लागू केली असून लष्कराला ‘शूट अँड साईट’चे आदेश देण्यात आले आहेत.

First moments of the Puerto Vallarta attack by CJNG. pic.twitter.com/4FnLwJhpW6 — Open Source Intel (@Osint613) February 22, 2026

credit – social media and Twitter

पोलीस अधिकारी ते जगातील सर्वात मोठा माफिया

एल मेंचोचा प्रवास थक्क करणारा आणि रक्तरंजित होता. तो एकेकाळी मेक्सिकोमध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होता. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले. अल्पावधीतच त्याने ‘सीजेएनजी’ ही स्वतःची संघटना उभी केली. लष्करी शिस्तीत आपल्या गुंडांना प्रशिक्षण देऊन त्याने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी सुरू केली होती. अमेरिकेने त्याच्या अटकेवर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

अमेरिकन दूतावासाचा ‘हाय अलर्ट’

मेक्सिकोमधील या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत अमेरिकन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम यांनी या मोहिमेचे अधिकृत तपशील सुरक्षा मंत्रिमंडळ लवकरच जाहीर करेल असे सांगितले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एल मेंचो कोण होता आणि तो का प्रसिद्ध होता?

    Ans: एल मेंचो हा 'जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल' (CJNG) चा प्रमुख आणि जगातील सर्वात शक्तिशाली ड्रग माफिया होता. तो अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करीसाठी ओळखला जात असे.

  • Que: एल मेंचोला कुठे आणि कसे मारले गेले?

    Ans: मेक्सिकोच्या जलिस्को राज्यातील तापलापा जवळच्या डोंगराळ भागात लष्कराने केलेल्या विशेष मोहिमेत तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • Que: त्याच्या मृत्यूंनंतर मेक्सिकोमध्ये हिंसाचार का झाला?

    Ans: त्याच्या 'सीजेएनजी' संघटनेच्या सदस्यांनी लष्करी कारवाईचा निषेध म्हणून आणि बदला घेण्यासाठी प्रमुख शहरे आणि रस्त्यांवर जाळपोळ आणि गोळीबार सुरू केला आहे.

Web Title: Mexican drug lord el mencho killed military operation violence jalisco

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Drug Mafia
  • international news
  • mexico news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
1

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

US Iran War: आज रात्री अमेरिका इराणचा गेम करणार? Donald Trump यांचा इराणवर हल्ला करण्याचा इशारा; जगाची धाकधूक वाढली
2

US Iran War: आज रात्री अमेरिका इराणचा गेम करणार? Donald Trump यांचा इराणवर हल्ला करण्याचा इशारा; जगाची धाकधूक वाढली

हवामान खराब, रेड कार्डचा झटका…!England ने Mexico चे ‘ते’ स्वप्न केले चक्काचूर, Fifa World Cup मध्ये…
3

हवामान खराब, रेड कार्डचा झटका…!England ने Mexico चे ‘ते’ स्वप्न केले चक्काचूर, Fifa World Cup मध्ये…

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले
4

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.