China's LAC buildup raises India's concerns China denies involvement
China LAC buildup : भारत-चीन सीमारेषा अर्थात एलएसीवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने एलएसीजवळील सहा महत्त्वाच्या हवाई तळांचे जलद गतीने आधुनिकीकरण सुरू केले असून, उपग्रह प्रतिमांद्वारे ही माहिती समोर आली आहे. यामुळे भारताच्या सुरक्षाव्यवस्थेसमोर नव्या प्रकारचे आव्हान निर्माण झाले आहे.
चीनने लुन्झे, टिंगरी, बुरंग, युटियान (केरिया), यारकंद आणि होतान या सहा एअरबेसवर मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. या हवाई तळांवर लढाऊ विमानांसाठी आश्रयस्थाने, नवीन धावपट्ट्या, शस्त्रास्त्रांचे डेपो, ड्रोन तळ, इंधन साठवणूक केंद्र आणि अत्याधुनिक रडार प्रणाली उभारण्यात आल्या आहेत. हे सर्व तळ भारताच्या सीमेला अगदी जवळ आहेत. काही फक्त ३० ते १५० किमी अंतरावर आहेत. त्यामुळे चीनच्या पीएलए वायूदलाला भारताविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणतात, ‘आमचा काहीही संबंध नाही’
Exclusive – 6 Airbases, 1 Big Move: China’s Play Against Indiahttps://t.co/fDVOZHNLoJ @divyamsharma99 pic.twitter.com/I1JTIeXCio
— Debanish Achom (@debanishachom) April 22, 2025
credit : social media
चीन ‘एअरबेस क्लस्टर स्ट्रॅटेजी’वर काम करत आहे. यामध्ये जवळपास असलेले अनेक हवाई तळ एकमेकांना समर्थन देऊ शकतील, अशी रचना करण्यात येत आहे. एका तळावर हल्ला झाला तरी दुसरा तळ तत्काळ मदत करू शकेल. यामुळे चीनची सामरिक क्षमता अधिक भक्कम होते आहे.
चीनच्या या आक्रमक पावलांसमोर भारत हातावर हात ठेवून बसलेला नाही. अंबाला व हासीमारा येथील राफेल लढाऊ विमाने, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची तैनाती, उंचावरच्या भागांतील विशेष लष्करी तुकड्या, न्योमा व तवांगसारख्या ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड्सचे आधुनिकीकरण हे सर्व उपाय भारताने केले आहेत. राफेल लढाऊ विमान काही मिनिटांत चीनच्या एअरबेसपर्यंत पोहोचू शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्य करण्यास सक्षम आहेत. भारतीय लष्कराचे विशेष पथक लडाख आणि अरुणाचलसारख्या भागांमध्ये दीर्घकाळ राहण्यासाठी सज्ज आहे.
सीमेवर उपग्रह आधारित आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे २४x७ नजर ठेवली जात आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण यंत्रणा सतर्क आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रावलकोटमध्ये रचला गेला होता पहलगाम हल्ल्याचा कट? ‘लष्कर-ए-तोयबाची’ उघड धमकी आणि भारताविरोधातील कटाचे नवे पुरावे
चीनची एलएसीजवळील हालचाल आणि भारताच्या त्वरित प्रतिसादाने दोन्ही देशांमध्ये सामरिक स्पर्धा अधिक तीव्र होत चालली आहे. चर्चेच्या वाटचालीसोबतच दोन्ही देशांनी सध्याच्या परिस्थितीत सजग राहून तणाव नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. युद्ध नाही, तर शांती हाच दोन्ही राष्ट्रांचा अंतिम उद्देश असायला हवा.