तुर्कस्थान (Turkey Earthquake) आणि सीरियात (Syria Earthquake) या दशकातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे. तीन भूकंप एकापाठोपाठ एक झाल्यानं सगळंच उद्ध्वस्त झालंय. आताा भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियामध्ये, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश शांत झाला आहे. तुर्कस्थान आणि सीरियात भुकंपामुळे झालेल्या मृतांची संख्या 28,000 वर पोहोचली आहे. तर, ढिगाऱ्याखालून 10 दिवसांच्या नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.
तुर्की-सीरियातील (Turkey Syria Earthquake) शतकातील सर्वात विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेच्या 122 तासांनंतर तीन महिलांचे जिवंत राहणं हा एक चमत्कार मानला जात आहे. त्यापैकी पहिली महिला 70 वर्षीय मेनेक्से तबक आहे. दुसरी 55 वर्षीय मसाल्लाह सिसेक आणि तिसरी 40 वर्षीय झेनेप कहरामन.104 तासांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलेला झेनेप पहिली महिला आहे.
[read_also content=”ऐन हिवाळ्यात पावसाळा? ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती, जाणून घ्या तुमच्या जिव्ह्यात पाऊस पडणार का? https://www.navarashtra.com/maharashtra/chance-of-rain-in-these-states-weather-department-information-know-whether-it-will-rain-in-your-life-369112.html”]
तुर्कस्तान-सीरियातील विध्वंसाच्या अनेक चित्रांमध्ये अशी काही छायाचित्रे आहेत जी डोळ्यात आनंदाश्रू आणल्याशिवाय राहत नाही. या विनाशकारी भुकंपात 10 दिवसांचं नवजात बाळ आश्चर्यकारक रित्या जिवंत आढळलं आहे. यागीज उल्स नावाच्या या बाळाची ढिगाऱ्यातून सुटका करण्यात आली आहे. दक्षिणेकडील हाते प्रांतात भूकंपाच्या 90 तासांनंतर 10 दिवसांचे बाळ आणि त्याच्या आईला जिवंत बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखालुन लोकं जिवंत बाहेर निघण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.
भारतातून तुर्कस्तानला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली जात आहे. लष्कर आणि एनडीआरएफ टीमनंतर आता भारतातील लोक कडाक्याच्या थंडीत ब्लँकेटचे वाटप करत आहेत. तुर्कीचे राजदूत फिरात सनेल यांनी 100 ब्लँकेट पाठवण्याचे असेच एक पत्र ट्विट करून हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी पत्रात वसुधैव कुटुंबकमचा संदेशही शेअर केला आहे. ९ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.४८ वाजता शेअर केलेली पोस्ट आतापर्यंत १.१३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि २.५ हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनी लाइक केले आहे. फिरातने भारतीयांचेही आभार मानले. कुलदीप, अमरजीत, सुखदेव आणि गौरव नावाच्या चार भारतीयांनी तुर्की भूकंपग्रस्तांसाठी 100 ब्लँकेट दान केले आणि पत्रात लिहिले की, तुर्कस्तानच्या सर्व लोकांना विनम्र. देव तुर्कियेला आशीर्वाद देवो आणि या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत देवो.