इस्लामाबाद : आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेला (SriLanka) पाकिस्तानने (Pakistan) २० कोटी डॉलर्सचे कर्ज देणार असल्याची घोषणा केली आहे. श्रीलंकेत तांदळाचा (Rice) आणि सिमेंटचा व्यवसाय (Cement Business) सुरु करण्यासाठी हे कर्ज (Loan) दिले जाणार आहे. श्रीलंकन सरकारनेही ही माहिती अधिकृत असल्याचे सांगितले आहे. श्रीलंकेत नोव्हेंबर २०२१ पासून आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
इम्रान खान सरकारची (Imran Khan) ही चाल कुणालाही पचनी पडत नाहीये. सध्या पाकिस्तानावरच अब्जावधी डॉलर्सचे कर्ज असताना, या मदतीबाबत टीका होते आहे. ६ महिन्यांपूर्वी नाक घासल्यानंतर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बुधवारी १ अब्ज डॉलर्स कर्जाचे आश्वासन पाकिस्तानला मिळाले आहे.
चीनचा दौरा करुन पाकिस्ताने चीनपुढेही ३ अब्ज डॉलर्ससाठी हात पसरले आहेत. डिसेंबरमध्ये सौदी अरब दौऱ्यात ३ अब्ज डॉलर्सची गंगाजळी कशीबशी पाकिस्तानच्या हाती लागली होती. आता मात्र ते पैसे वाटत फिरत आहेत.