कोलंबो : अर्थव्यवस्था डबघाईला, वाढती महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना (Facing the financial crisis ) करणाऱ्या श्रीलंकेत आता आणीबाणीची घोषणा (Sri Lanka now declares a state of emergency) करण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांचा उद्रेक (Outbreaks of civilians) झाला असून, राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. (Movement on the streets of Colombo ) राजधानी कोलंबोत (colomba) हजारोंच्या संख्येने लोक संसद भवनाजवळ (Parlament) आंदोलन करत आहेत. त्यामुळं पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी आणीबाणीची घोषणा (emergency) केली.
[read_also content=”मुली अशा का वागतात? https://www.navarashtra.com/lifestyle/why-do-girls-behavior-like-this-nrrs-303725.html”]
दरम्यान, अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. यामुळे हिंसाचार देखील वाढला आहे. दरम्यान पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळं या वादात 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षा रक्षक यांना मालदीवला जाण्याची परवानगी दिली होती. गोतबाया राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. श्रीलंकेत आता आणीबाणीची घोषणा केल्यामुळं परिस्थिती खूप चिघळली असून, संतप्त नागरिकांना आवर कशी घालायची हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलीस बंदोबस्त अधिक तैनात करण्यात आला आहे.