Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel’s attack on Gaza: युद्धबंदीनंतर गाझामध्ये पुन्हा विध्वंस; इस्रायली सैन्याचा गाझावर हल्ला, ८१ जणांचा मृत्यू

गाझामध्ये झालेल्या जोरदार हवाई हल्ल्यांनंतर इस्रायली लष्कराने पुन्हा युद्धबंदी लागू केल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कर युद्धबंदी कराराचे पालन करत राहील परंतु कोणत्याही उल्लंघनाला "कठोर" प्रत्युत्तर देईल.असा इशारा दिला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2025 | 08:15 PM
israel palestine conflict

israel palestine conflict

Follow Us
Close
Follow Us:
  • गाझामध्ये युद्धबंदी लागू
  • इस्रायलचे रात्रीच्या वेळी पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ले
  • ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्यांना समर्थन दिले

Israel’s attack on Gaza: गाझामध्ये युद्धबंदी लागू झालेली असतानाही इस्रायलने रात्रीच्या वेळी पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. गाझामध्ये रात्रीच्या वेळी झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये 81 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने हमासने त्यांच्या सैन्यावर हल्ला केल्याचा आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

सुरुवातीला गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नंतर, अनेक मुलांसह किमान ६० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. गाझामघील शिफा हॉस्पिटलचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये सात महिला आणि सहा मुलांसह आणखी २१ मृतदेह दाखल झाले आहेत. यामुळे गाझा हवाई हल्ल्यात मृतांची एकूण संख्या ८१ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे, कारण २० मुलांसह ४५ जखमींपैकी अनेक जण गाझा शहरातील रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत.

AFG vs PAK War : तुर्कीतील अफगाणिस्तान-पाकिस्तान शांतता चर्चा निष्फळ! सीमा वादावरून तणाव शिगेला

गाझामध्ये झालेल्या जोरदार हवाई हल्ल्यांनंतर इस्रायली लष्कराने पुन्हा युद्धबंदी लागू केल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कर युद्धबंदी कराराचे पालन करत राहील परंतु कोणत्याही उल्लंघनाला “कठोर” प्रत्युत्तर देईल.असा इशारा दिला आहे. मंगळवारी, दक्षिण गाझामध्ये हमासने इस्रायली सैन्यावर केलेल्या गोळीबारानंतर, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सैन्याला गाझाविरुद्ध तात्काळ मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, इस्रायली सैन्याने रात्री उशिरा गाझावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला सुरू केला, त्यासोबत टँक गोळीबार आणि स्फोटांचे आवाज आले. इस्रायल आणि हमास यांनी एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्यांना समर्थन दिले

आशिया दौऱ्यावर असलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. “गाझाच्या दक्षिणेकडील रफाह शहरात हमासच्या हल्ल्यात एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेले हल्ले योग्य आहेत.”असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, हमासने प्राणघातक गोळीबारात कोणताही सहभाग नाकारला आहे आणि इस्रायलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

Brazil Police News: रस्त्यांवर मृतदेहांचा खच…; ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये नेमकं काय झालं?

रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग…

मध्य गाझा शहरातील देईर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयाने इस्रायली हवाई हल्ल्यांनंतर रात्री सुमारे १० मृतदेह मिळाल्याची माहिती दिली आहे, ज्यात तीन महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे. दक्षिण गाझा येथील खान युनिस येथील नासेर रुग्णालयाने सांगितले की इस्रायलीच्या पाच हल्ल्यांनंतर त्यांना १३ मुले आणि दोन महिलांसह २० मृतदेह मिळाले आहेत. मध्य गाझा येथील इतरत्र, अल-अवदा रुग्णालयाने म्हटले आहे की त्यांना १४ मुलांसह ३० मृतदेह मिळाले आहेत. हमासने रफाह गोळीबारात सहभाग नाकारला आणि युद्धबंदीची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. हमासने दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांना इस्रायलवर लढाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले.

Web Title: Demolition again in gaza after the war israeli army attacks gazawar 81 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 08:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.