रिओ दी जेनेरिओमध्ये ब्राझील पोलिसांची ड्रग्ज माफियांवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; ६४ जणांच मृत्यू
Brazil Police News: ब्राझील पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईमुळे रिओ दि जानेरो शहर हादरले ब्राझीलच्या पोलिसांनी ड्रग्ज माफिया, रेड कमांडो यांच्याविरुद्ध इतिहासातील सर्वात मोठी कारवाई सुरू केली, टोळीतील सदस्यांना शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी हेलिकॉप्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. परिणामी, रिओचे रस्ते मृतदेहांनी भरले होते.
पोलिस कारवाईबाबत ब्राझील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोमांडो व्हर्मेल्हो (रेड कमांड) ही एक शक्तिशाली ड्रग्ज तस्करी करणारी टोळी लक्ष्य करण्यात आली होती. ही टोळी रिओमध्ये आपला प्रभाव आणि नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत होती. ब्राझीलच्या पोलिस कारवाईत रिओ दि जानेरोच्या दोन भागात ड्रग्ज तस्कर आणि माफिया यांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आणि ८१ जणांना अटक करण्यात आली.
अहवालांनुसार, या भागातील ड्रग्ज तस्करी टोळीविरुद्धच्या कारवाईत २,५०० पोलिस अधिकारी सहभागी होते. पण या कारवाईत चार पोलिस अधिकारी देखील मृत्युमुखी पडले. रिओचे गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी कॉम्प्लेक्सो दा पेन्हा आणि कॉम्प्लेक्सो दो अलेमाओ जवळील कारवाई ही इतिहासातीस सर्वात मोठी कारवाई होती. असे म्हटले आहे.
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जिथे ड्रग्ज तस्करी आणि पोलिसांचे छापे सामान्य आहेत. तथापि, या भागात असंख्य गरीब वस्त्या आहेत, जिथे एक मोठे बेकायदेशीर ड्रग्ज तस्करी नेटवर्क अस्तित्वात आहे. राज्यासमोर सुरक्षा आव्हान उभे राहिले आहे. ही टोळी डाव्या विचारसरणीच्या कैद्यांच्या संघटनेतून ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीत गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कमध्ये विकसित झाली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
गोळीबार आणि ड्रोन हल्ला
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, छाप्यादरम्यान टोळीतील सदस्यांनी ड्रोनने गोळीबार केला आणि सुरक्षा दलांवर हल्ला केला. गुन्हेगारांनी पेन्हा कॉम्प्लेक्स परिसरात ड्रोनचा वापर करून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात चार पोलिसांसह ६४ जणांचा मृत्यू झाला.
वृत्तानुसार, पोलिसांनी कारवाईदरम्यान किमान ४२ रायफल, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी ज्या भागात टोळी सक्रीय होती. तो सर्व भाग पोलिसांनी वेढला होता. पोलिसांनी प्रवेश करताच ड्रग्ज माफियांवर गोळीबार सुरू केला.
पण दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने रिओ दि जानेरोमधील कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एकाच दिवसात ६० हून अधिक लोकांचे मृत्यू “अत्यंत भयानक आणि चिंताजनक” आहेत आणि संपूर्ण कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.






