अमेरिकेतील महिला खासदार ग्रेस मेंग अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विशेष विधेयक मांडले होते. यामध्ये त्यांनी दिवाळीला (Diwali) सुट्टी (National Holiday )देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. हे विधेयक मंजूर (Diwali Holiday In NewYork) करण्यात आलं असून आता न्यूयॉर्कमध्ये दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे अमेरिकेतील नागरिकांनी स्वागत केले आहे.
[read_also content=”मुंबईच्या पहिल्याच पावसात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले…सामनातून शिंदे सरकारवर निशाणा https://www.navarashtra.com/maharashtra/saamana-targeting-shinde-government-all-claims-of-shinde-government-were-washed-away-with-mumbai-first-rain-nrps-423507.html”]
याविषयी बोलताना न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स म्हणाले की, त्यांना अभिमान आहे की राज्य सभागृह आणि राज्य सिनेटने न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीत बंद ठेवण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे.
“आम्हाला विश्वास आहे की, राज्यपाल या विधेयकावर स्वाक्षरी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “हा विजय आहे…केवळ भारतीय समुदायातील महिला आणि पुरुष आणि दिवाळी साजरी करणाऱ्या सर्व समुदायांचाच नाही, तर न्यूयॉर्कचा विजय आहे,” असेही अॅडम्स म्हणाले.
#WATCH | Diwali to become school holiday in New York City, US
“I’m so proud to have stood with Assemblymember Jenifer Rajkumar and community leaders in the fight to make Diwali a school holiday. I know it’s a little early in the year, but: Shubh Diwali,” tweets Mayor Eric Adams… pic.twitter.com/TfrlU7KWwm
— ANI (@ANI) June 27, 2023
अलीकडेच, पेनसिल्व्हेनिया राज्याच्या सिनेटमध्ये दिवाळीला अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करण्यासंबंधी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आमदार निखिल सावळ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे. ते म्हणाले होते- दिवाळीला सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी आणलेले विधेयक सिनेटमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. पेनसिल्व्हेनियामध्ये हा सण साजरा करणाऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. आता संपूर्ण राज्य समाजासोबत मिळून दिवाळी साजरी करणार आहे.
फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डी-सँटिस हे देखील 2019 पासून गव्हर्नर हाऊसमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. तो या समाजाला विशेष महत्त्व देतो. कोरोनाच्या काळातही फ्लोरिडा येथील गव्हर्नर हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम होती.
यूएन इंटरनॅशनल मायग्रेशन रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 1.80 कोटी परदेशी भारतीय आहेत. यापैकी 4.4 दशलक्ष लोक अमेरिकेत राहतात. येथे, 6 राज्यांतील 10 जिल्ह्यांमध्ये भारतीय-अमेरिकन लोकांची संख्या 6-18% आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, इलिनॉय येथे त्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे.