donald trump
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका रॅलीत गोळीबार करण्यात आला. प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प हे बोलत होते. नेमकं त्याचदरम्यान एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते जखमी झाले आहेत.
अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यानुसार, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच त्यांची शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत त्यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली. त्यामध्ये ते जखमी झाले. यात रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांना तातडीने त्या ठिकाणाहून हलवून वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षारक्षक चांगलेच सतर्क झाले. त्यांनी ट्रम्प यांना तातडीने स्टेजवरून उतरवले. जेव्हा त्यांच्याकडे पाहिला असता त्याच्या चेहऱ्यावर रक्त असल्याचे दिसून आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नंतर ट्रम्प गेले निघून
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत जसा गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्यांनी हाताने उजवा कान धरला. हे पाहण्यासाठी त्यांनी हात खाली आणला आणि नंतर व्यासपीठाच्या मागील बाजूला ते गुडघ्यावर बसले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी लगेच त्यांना घेरलं. लगेच काही मिनिटानंतर ते बाहेर पडले.