Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump : ‘…तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार’; ट्रम्प यांचा BRICS देशांना इशारा

भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया या सर्व ब्रिक्स सदस्य देशांवर टॅरिफ लागू होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 09, 2025 | 02:29 AM
तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार; ट्रम्प यांचा BRICS ला धमकी

तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार; ट्रम्प यांचा BRICS ला धमकी

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS गटातील देशांना मोठा झटका देत, १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया या सर्व ब्रिक्स सदस्य देशांवर टॅरिफ लागू होणार आहे. यावर लवकर निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे BRICS आणि अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, “ब्रिक्स गटाची स्थापना अमेरिका आणि अमेरिकन डॉलरला कमजोर करण्यासाठीच झाली होती. डॉलर हा किंग आहे आणि तो तसाच राहणार. जर कोणी त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.”

हमासने ओलांडली क्रूरतेची मर्यादा! इस्रायली महिला मृतदेहांचे केले लैंगिक शोषण अन्…; द टाईम्सचा धक्कादायक खुलासा

ट्रंप यांचा आरोप आहे की, BRICS देश वर्षानुवर्षे अमेरिकेचा आर्थिक फायदा घेत आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, इतर देश अमेरिकेवर अवाजवी कर आकारतात, तर अमेरिकेने मात्र अनेकदा विनासायास व्यवहार केले. यामुळे अमेरिकेला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता मात्र हे बदलणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, १ ऑगस्टपासून हे अतिरिक्त टॅरिफ लागू होतील आणि अमेरिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर पैसे यायला सुरुवात होईल. “आम्ही केवळ इतर देशांचे नियमच वापरत आहोत. आता सर्वजण आम्हाला सवलती द्यायला तयार झालेत, कारण त्यांना समजलंय की आता अमेरिका मागे हटणार नाही,” असे ते म्हणाले.

हे वक्तव्य ट्रम्प यांनी अशा वेळी केले आहे, जेव्हा जागतिक व्यापारात BRICS देशांच्या वाढत्या प्रभावाबाबत अमेरिका चिंता व्यक्त करत आहे. व्हाइट हाऊसने नुकतीच एक अधिकृत घोषणा करत सांगितले की, ट्रम्प BRICS गटाला अमेरिकन हितासाठी वाढता धोका मानतात आणि त्याविरोधात सर्व आवश्यक पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

BRICS गटाची स्थापना 2009 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीनने केली होती. दक्षिण आफ्रिकेचा समावेश 2010 मध्ये झाला, आणि अलीकडे सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया यांचाही गटात समावेश झाला आहे. त्यामुळे सध्या या गटात एकूण ११ सदस्य आहेत.

या टॅरिफ धोरणामुळे भारतासारख्या विकसनशील देशांच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः आयटी सेवा, फार्मा, पोलाद व वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारत सरकारकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर

सध्या अमेरिका आणि BRICS देशांमधील व्यापारसंबंध आधीच तणावाखाली आहेत, आणि ट्रम्प यांच्या या नव्या घोषणेमुळे त्यात आणखी कटुता येण्याची शक्यता आहे. आता या टॅरिफला भारत आणि इतर BRICS देश कशी प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Donald trump threat to impose 10 percent tariff on brics countries latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 11:31 PM

Topics:  

  • Brics Council
  • Donald Trump
  • Tarrif

संबंधित बातम्या

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; ज्युलिअस सिझरच्या इतिहासाची पुनरावृत्ती, काय झाल होतं तेव्हा?
1

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; ज्युलिअस सिझरच्या इतिहासाची पुनरावृत्ती, काय झाल होतं तेव्हा?

Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास
2

Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया
3

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया

Israel-Hamas ceasefire : इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम झाला तरी कसा? गाझा कराराच्या ‘खतरनाक’ अटी ट्रम्पच्या नावासह आल्या समोर
4

Israel-Hamas ceasefire : इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम झाला तरी कसा? गाझा कराराच्या ‘खतरनाक’ अटी ट्रम्पच्या नावासह आल्या समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.