European leaders meet for peace in Ukraine know the details
लंडन: सध्या रशिया-युक्रेन युद्ध तीव्र झाले असून शांततेसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतून युरोपच्या 18 नेत्यांनी 02 मार्च रोज लंडनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. दोन दिवासांपूर्वी झालेल्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील वादानंतर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत युरोपियन नेत्यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षमासाठी अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर सहमती दर्शवली.
पोलंडच्या पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांचे विधान
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी या बैठकीत मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, “आज 50 कोटी युरोपियन लोक 30 कोटी अमेरिकन लोकांना विनंती करत आहेत की, 14 कोटी रशियन लोकांपासून आमचे रक्षण करा. हा आमचा कमकुवतपणा नाही, तर आमच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे.” त्यांनी युरोपला स्वत:च्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारी घ्यावी आणि अमेरिकेवर अवलंबून राहण्याची सवय सोडावी, असेही स्पष्ट शब्दांत म्हटले.
युरोपच्या संरक्षण खर्चात वाढ करण्याची गरज
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी युरोपियन देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चात वाढची गरज अधोरेखित केली. त्यांनी स्पष्ट केले की, एक बलशाली आणि योग्य प्रकारे सुसज्ज युरोपच रशियाच्या आक्रमक धोरणांना प्रभावी उत्तर देऊ शकतो. तरच यूक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण होऊ शकते.
युक्रेनला पोलंडचा ठाम पाठिंबा
डोनाल्ड टस्क यांनी यूक्रेनला पोलंडचा संपूर्ण आणि अटूट पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी “पोलंड कोणत्याही अटींशिवाय यूक्रेनच्या बाजूने उभा राहिल असेही म्हटले. परंतु अमेरिकेच भूमिका काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. डोनाल्ड टस्क यांनी युरोपियन देशांना पोलंड आणि ब्लाटिक देशांच्या रशिया व बेलारुसच्यासोबतच्या सीमा अधिक मजबूत करण्याची विनंती केली. त्यांनी या भागांमध्ये अधिक सैन्य तैन्यात करण्याची गरज असल्याचे म्हटले.
युरोपिन सुरक्षा धोरणांवर नवी चर्चा
लंडनमध्ये झालेल्या युरोपियन नेत्यांच्या या बैठकीनंतर युरोपच्या संरक्षण धोरणांवर नव्या चर्चांना चालना मिळण्याची शक्यता आहे. पोलंडचे पंतप्रधान टस्क यांनी ट्रान्स अटलांटिक सुरक्षा चर्चेसाठी युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यात शिखर परिषद घेण्याचा प्रस्तावाचे समर्थने केल. यामुळे पुढील काळात युरोपच्या संरक्षण धोणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यावर काय भूमिका घेतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात पुन्हा एकदा विनाशाचे वादळ; इस्त्रायलचा भयानक हल्ला