
Russia Ukraine War Russian drone attack killed family
Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री १०० हून अधिक ड्रोन्सचा मार केला होता. या हल्ल्यात युक्रेनमधील खार्किव्ह प्रदेशाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्या शहरातील एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण कुटुंबा ढिगाऱ्याखांली अडकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ३४ वर्षीय वडिलांचा आणि २ वर्षांच्या जुळ्या आणि १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर या चिमुकल्यांची आई गरदोर असून गंभीर जखमी आले. या घटनेने संपूर्ण युक्रेन हादरला आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने इराणी ड्रोन शाहेदची प्रतिकृती असलेले गेरन-२ ड्रोनन्सचा मारा केला आहे. रात्रभर १०० हून अधिक ड्रोन्स रशियाने युक्रेनवर डागले आहेत.
याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelenksy) यांनी म्हटले की, अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) युद्धबंदीसाठी जून २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु रशियाचा प्रत्येक हल्ला राजनैतिक मार्गाने युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांना कमकुवत करत आहे. रशिया पुन्हा पुन्हा युक्रेनवर दबाव बनण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनसाठी सुरक्षा हमी गरजेची असल्याचे या हल्ल्यांवरुन स्पष्ट होत आहे.
सध्या रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात अमेरिका-रशिया-युक्रेन त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. युक्रेनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. परंतु अद्याप रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. झेलेन्स्की यांनी सांगितले की, परिस्थिती अजूनही गंभीर आहे. रशियाच्या मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या उर्जा आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. यामुळे युक्रेनमध्ये मोठे वीज संकट उभे राहिले आहे.
Ans: रशियाने युक्रेनवर बुधवारी (११ फेब्रुवारी) खार्किव्ह प्रदेशात हल्ला केला आहे.
Ans: रशियाच्या खार्किव्ह प्रदेशावरील हल्ल्यात एकाच कुटुंबातील ३ चिमुकले आणि एका वडीलांचा बळी गेला आहे. तसेच त्यांचे संपूर्ण घरही जळाले आहे.