Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायजेरियात तेल टँकर ट्रकला धडकून भीषण स्फोट; 48 जणांचा मृत्यू

नायजेरियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक तेल टॅंकर दुसऱ्या वाहनाला धडकला. टॅंकर धडकून ट्रक भयंकर आग लागली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, या आगीत 48 जणांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर-मध्य नायजेरियात हा स्फोट झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 09, 2024 | 12:49 PM
नायजेरियात तेल टँकर ट्रकला धडकून भीषण स्फोट; 48 जणांचा मृत्यू

नायजेरियात तेल टँकर ट्रकला धडकून भीषण स्फोट; 48 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आफ्रिकन देश नायजेरियामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. एक तेलवाहू टॅंकरने दुसऱ्या वाहनाला जोरदार टक्कर दिली. यामुळे टॅंकरला आग लागून भयंकर स्फोट झाला. या स्फोटात  48 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. देशाच्या आपत्कालीन प्रतिसाद संस्थेने या घटनेची माहिती दिली. उत्तर-मध्य नायजरिया राज्यात हा स्फोट झाला. उत्तर-मध्य नायजरियात  इंधनाने भरलेला ट्रक प्रवासी आणि गुरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला धडकला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले.

नायजरियाचेआपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांनी सांगितले की, टँकर उत्तर-मध्य नायजर राज्याच्या अगाई प्रदेशाकडे जात होता. ज्याने प्रवास्यांनी आणि गुरांनी भरलेल्या वाहनाला टक्कर दिली. ज्यामध्ये किमान 50 गुरे जिवंत जाळाले. नायजेरिया तेल टंचाईशी झगडत असताना ही दुर्घटना घडली. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये तेलासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नायजेरियाच्या सरकारी मालकीच्या कंपनी NNPC लिमिटेडने गेल्या आठवड्यात गॅसोलीनच्या किमतीत किमान 39% वाढ केली. वर्षभरातील ही दुसरी मोठी वाढ आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात इंधनाचा तुटवडा असून, त्यामुळे लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. नायजेरियात रेल्वे नेटवर्क नसल्यामुळे माल वाहतूक करण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागतो. त्यामुळे आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या नायजेरियातील बहुतांश मुख्य रस्ते आणि महामार्गांवर असे अपघात होत असतात. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1,531 अपघात झाले, ज्यामध्ये एकूण 535 लोकांचा मृत्यू झाला तर 1,142 जण जखमी झाले.

Emergency situation beside Agaie, along Agaie Bida road, Niger state. Tanker fell and led to the burning of several vehicles. Medical attention needed @FRSCNigeria @daily_trust @MobilePunch @ARISEtv pic.twitter.com/PqvMVzlHhl

— Mansur A. Oladele (@Ibn_Hussayn) September 8, 2024


मृतदेह सामूहिकपणे पुरले

40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यानंतरच्या निवेदनात असे म्हटले आहे की अपघातात अतिरिक्त मृतदेह सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व मृतदेह सामूहिकरित्या पुरण्यात आले आहेत. नायजर राज्याचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी बाधित भागातील रहिवाशांनी शांत राहावे आणि रस्ता वापरकर्त्यांना “नेहमी सतर्क राहावे आणि जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे” असे सांगितले.

Web Title: Fatal explosion hits oil tanker truck in nigeria 48 people demised nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • Nigeria News

संबंधित बातम्या

‘या’ छोट्या आफ्रिकन देशाने ट्रम्पला दाखवला ठेंगा ; हद्दपार स्थलांतरितांना घेण्यास दिला नकार
1

‘या’ छोट्या आफ्रिकन देशाने ट्रम्पला दाखवला ठेंगा ; हद्दपार स्थलांतरितांना घेण्यास दिला नकार

अमानूषतेचा कळस! बंद खोलीत डांबून अंदाधूंद गोळीबार, नायजेरियात शेकडोंच्या मृत्यूच्या किंकळ्या
2

अमानूषतेचा कळस! बंद खोलीत डांबून अंदाधूंद गोळीबार, नायजेरियात शेकडोंच्या मृत्यूच्या किंकळ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.