जॉर्डनमध्ये इस्त्रायल दूतावासावर गोळीबार; प्रत्युत्तरात हल्लेखोर ठार, 3 पोलिस कर्मचारी जखमी
अम्मान: जॉर्डनमधील इस्त्रायली दूतावासावर रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात हल्लेखोर ठार झाले असून 3 पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. अम्मानमधील दूतावासाच्या आसपासच्या परिसरामध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिस गल आणि रुग्णवाहिकांना त्वरित पाठवण्यात आले आहे.
इतर लोकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांचा शोध पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोळीबार झालेल्या भागात इस्त्रायल विरोधात सतत आंदोलन सुरू असतात. गाझा युद्धानंतर इस्त्रायल विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. यामुळे आणखी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
تغطية صحفية: سماع إطلاق نار في محيط سفارة الاحتلال في العاصمة عمان مع تواجد أمني مكثف pic.twitter.com/Ompju7JX31
— شبكة قدس الإخبارية (@qudsn) November 24, 2024
लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 20 ठार
दुसरीकडे, लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली हवाई दलाने बेरूतवर हल्ला केला आणि एका निवासी इमारतीला लक्ष्य केले. हल्ल्याचे मुख्य कारण म्हणून इस्रायली अधिकाऱ्यांनी हिजबुल्लाचा टॉप कमांडर मोहम्मद हैदरला ठार करण्याचे उद्दिष्ट सांगितले.
मात्र, हिजबुल्लाने दावा केला आहे की, या हल्ल्यात त्यांचा कोणताही सदस्य मारला गेलेला नाही. तसेच हल्ला केलेल्या ठिकाणी कोणताही कमांडर उपस्थित नव्हता. या हल्ल्यामध्ये आणखी 66 जण जखमी झाले असून, अनेकांची स्थिती गंभीर आहे. या हल्ल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
ओलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलने
इस्रायलने लेबनॉनवर हल्ला करताच, हमासच्या कैदत असलेल्या महिला ओलिसच्या सुटकेसाठी आंदोलने सुरू आहेत. शनिवारी रात्री, तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. मात्र, हमासने दावा केला आहे की, उत्तर गाझामध्ये कैद केलेल्या महिला ओलिसचा मृत्यू झाला आहे.
हमासच्या अल-कासिम ब्रिगेडच्या प्रवक्त्याने म्हटले की, शत्रूची एक महिला कैदी मारली गेली आहे आणि अजून एक महिला कैदीच्या जीवाला धोका आहे. इस्रायली लष्कराने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. या सर्व घटनांमुळे इस्रायल आणि मध्य पूर्वात आणखी तणाव निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यातील शांततेसाठी धोके निर्माण होण्याची भीती आहे.