फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ॲमस्टरडॅम: जगभरात पॅलेस्टिनी समर्थकांमध्ये इस्त्रायलच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. यामुळे हिंसाचारात वाढ होऊन ज्यू समुदायांच्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ज्यू समुदायाच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, डच सरकारने एक नवीन योजना तयार केली आहे. या योजनेचा उद्देश सेमिटिझम (ज्यूविरोध) आणि संबंधित हिंसाचारावर नियंत्रण ठेवणे आहे.
पॅलेस्टिनी समर्थकांनी सोशल मीडियाद्वारे हल्ल्याचा कट रचला होता
ही योजना ॲमस्टरडॅममधील एका फुटबॉल सामन्याच्या वेळी पॅलेस्टिनी समर्थकांनी इस्रायली समर्थकांवर हल्ला केल्यानंतर तयार करण्यात आली. 8 नोव्हेंबर 2024 रोजी, मॅकाबी इस्रायली फुटबॉल क्लबच्या समर्थकांवर हल्ला झाला होता. यामध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी सोशल मीडियाद्वारे हल्ल्याचा कट रचला होता असे म्हटले जात होते. या हिंसाचारामुळे ज्यूंच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली. या हल्ल्यामुळे डच सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
डच आणि इस्रायली राजकारण्यांमध्ये तीव्र नाराजी
मिळालेल्या माहितीनुसार, योजनेसाठी डच सरकारने दरवर्षी अतिरिक्त 4.7 दशलक्ष डॉलर राखून ठेवले असल्याचे म्हटले आहे. याचा उपयोग ज्यू समुदायाच्या स्थलांतर, पूजा स्थळांवर सुरक्षा वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे. डच कायदा मंत्री डेव्हिड व्हॅन वेल यांनी याबाबत मीडियाशी बोलताना सांगितले की, “गेल्या वर्षभरात नेदरलँडमध्ये सेमिटिझममध्ये वाढ झाली आहे.” ते म्हणाले की, “ॲमस्टरडॅममधील घटना याची पुष्टी करतात.”
या हिंसाचारामुळे डच आणि इस्रायली राजकारण्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डच पंतप्रधान डिक शूफ यांनी या धोरणाचे समर्थन करत सांगितले की, “हे धोरण दडपशाही आणि प्रतिबंध यांचे मिश्रण आहे, आणि आम्हाला योग्य संतुलन सापडले आहे.”
दहशतवाद आणि हिंसाचार विरोधात कठोर कायदे
सेमिटिझमविरोधी उपायांच्या अंतर्गत डच सरकारने सेमिटिक विरोधी कार्यदलाची स्थापना केली आहे. याचा उद्देश हिंसाचाराचे निराकरण करणे आणि ते प्रतिबंधित करणे आहे. तसेच, फुटबॉल स्टेडियममध्ये सेमिटिझम विरोधी घोषणांवर देखील लक्ष ठेवले जाईल.
याशिवाय, दहशतवादाचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींसाठी कठोर कायदे आणि निषेधात हिंसाचार घडवणाऱ्यांसाठी चौकशी करण्याची मागणी केली आहे.यामुळे, डच सरकारने ज्यूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत, आणि यामुळे नेदरलँड्समध्ये आणि जगभरातील ज्यू समुदायाला थोडं राहत मिळण्याची आशा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- लंडनमधील अमेरिकन दूतावासाजवळ संशयास्पद स्फोट; घटनेचा तपास सुरू