फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरुत: इस्त्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनच्या बेरुत शहरावर भीषण हल्ला केला आहे. हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर लक्ष्य करत हे हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये 15 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. लेबनॉनमधील नागरिक स्वयंसेवी संघटनेच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आपात्कालीन बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेकजण मलब्याच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेले आहेत.
एकाच आठवड्यात चौथ्यांदा हल्ला
इस्त्रायलचे एकाच आठवड्यात बेरूतव चौथा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे ज्यावेळी अमेरिकन दूत अमोस होचस्टीन लेबनान आणि हिजबुल्लाह यांच्यात संघर्षविरामसाठी चर्चा करण्यास गेले होते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 3500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 15,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत आणि जवळपास 12 लाख लोक स्थलांतर झाले आहेत.
हल्लामुळे एक आठ मजली इमारत पूर्णपणे कोसळली आहे
लेबनॉनमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलचा बेरूतवर हल्लामुळे एक आठ मजली इमारत पूर्णपणे कोसळली आहे. इमारतीत अनेक लोक अडकलेले असून, बचावकार्य अजूनही सुरू आहे. इस्त्रायलचा हल्ल्यामुळे, युद्धाच्या परिस्थितीमध्ये आणखी गंभीरता येऊन नागरिकांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. यापूर्वी, इस्त्रायलने लेबनानमधून होणाऱ्या हल्ल्यांच्या दडपणाखाली हिजबुल्लाहला लक्ष्य केले असून, आता जखमी आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती वाढली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
पंतप्रधान नेतन्याहूंना अटक
दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे. नेदरलँडच्या परराष्ट्रमंत्री वेल्डकॅम्प यांनी त्यांचा नियोजित इस्रायल दौरा रद्द केला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यावर गाझामधील कथित युद्ध गुन्ह्यांशी संबंधित अरेस्ट वॉरंट जारी केल्यानंतर वेल्डकॅम्प यांनी हा निर्णय घेतला. वेल्डकॅम्प यांनी नेदरलँड्स ICC च्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगितले आणि नेतन्याहू यांच्याशी सर्व अनावश्यक संपर्क तोडण्याची घोषणा केली. या घटनेमुळे नेतन्याहूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिकच कमकुवत झाली आहे.
नेतन्याहूंच्या अटक वॉरंटमुळे इस्रायलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
या युद्धामुळे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. नेतन्याहूंच्या अटक वॉरंटमुळे इस्रायलच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धोरणांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा इस्रायल-हमास युद्धावर तसेच जागतिक राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.