Georgia protesters try to storm tbilisi presidential palace
Georgia Anti-Government Protest : तिबिलिसी : शनिवारी (०४ ऑक्टोबर) जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने झाली आहे. जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी येथील राष्ट्रपती भवनात हजारो लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस आणि निदर्शकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. सत्ताधारी पक्षाच्या विजयानंतर विरोधकांनी लोकांना लोकशाही वाचवण्याचा हेतूने एकत्र येण्याचे आणि शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले. परंतु या आंदोलनाने आता हिंसक रुप घेतले आहे.
मॉस्को टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विजयानंतर देशभरात हिंसाचार सुरु झाला. लोकांनी लोकशाही वाचवण्याच्या विरोधी पक्षाच्या आवाहनला प्रतिसाद देत ही निदर्शने केले. विरोधी नेत्यांनी डॉर्जियन ड्रीम पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले होते. विरोधकांनी सत्ताधारी पक्ष हा रशिया (Russia) समर्थक आणि हुकूमशाही असल्याचा आरोप केला. परंतु या निदर्शनांमदरम्यान पोलिसांनी केलेल्या वारामुळे वातावरण अधिक पेटले.
Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण
सध्या तिबिलिसीमधील परस्थिती अधिक बिकट झाली आहे. निदर्शकांनी राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सुरक्षा दलांनी आणि पोलिसांनी निदर्शकांना तोडण्यासाठी त्यांच्यावर पाण्याच्या तोफांचा, आणि अश्रुधुराचा मारा केला. मात्र यामुळे संतप्त होत जमावाने बॅरिकेड्स तोडून राष्ट्रापती भवनात प्रवेश केला. यामुळे सध्या जॉर्जियात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
याच वेळी जॉर्जियाचे पंतप्रधान इराक्ली कोबाखिड्धे यांनी या निदर्शनांवर आपली प्रतिक्रिया देत युरोपियन युनियनवर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या मते, जॉर्जियात युरोपियन युनियन देशात हिंसा भडकवल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी युरोपियन युनियनचे राजदूत पावेल हर्क्झिन्स्की यांना जबाबदार धरले आहे.
एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान इराक्ली कोबाखिड्झे यांनी सांगितले की, “युरोपियन युनियनचे प्रतिनिधी आणि काही परदेश लोक जॉर्जियातील संवैधानिक व्यवस्था उलटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.”
त्यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविरोधात ही निदर्शने सुरु आहेत. यातील बुहतेक लोक युरोपियन युनियनला पाठिंबा देणारे आहेत. त्याच लोकांनी सत्ताधारी पक्षावर बहिष्कार टाकला आहे. निवडणुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे इराक्की यांनी म्हटले आहे. याच वेळी जॉर्जियन अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोजकांनी कठोर शिक्षेचा इशाराही दिली आहे.
प्रश्न १. जॉर्जियात कोणाविरोधात सुरु आहेत निदर्शने?
जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने सुरु आहेत.
प्रश्न २. जॉर्जियाच्या पंतप्रधान इराक्ली यांनी या निदर्शनांवर काय प्रतिक्रिया दिली?
जॉर्जियाचे पंतप्रधान इराक्ली यांनी निदर्शनांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी युरोपियन युनियनचे राजदूत पावेल हर्क्झिन्स्की आणि काही परदेशी लोक देशात हिंसा भडकवत असल्याचे म्हटले आहे.
प्रश्न ३. जॉर्जियात का सुरु आहेत निदर्शने?
विरोधकांनी सत्ताधारी पक्ष हा रशिया समर्थक आणि हुकूमशाही असल्याचा आरोप करत लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना या शांततापूर्ण निदर्शनांचे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक निवडणुकीतील विजयानंतर ही निदर्शने सुरु झाली आहेत.
‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी