Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण (फोटो सौजन्य: iStock)
Japana Earthqake news in Marathi : टोकियो : शनिवारी (०४ ऑक्टोबर) रात्री उशिरा जपान (Japan) भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरला आहे. जपानच्या होन्शु बेटावर पूर्व किनारी भागात तीव्र भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी होती. भूकंप इतका जोरदार होता की जमिनी, इमारती हादरल्या होत्या. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हे ५० किलोमीटर खोल होते. यामुळे सामान्य ते मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले.
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण?
NCS ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र होन्शु बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात होते. यामुळे फुकुशिमा, मियागी आणि इवाते प्रीफेक्चरसह किनारी भागांमध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. मीडिया रिपोर्टनुसार, भूकंप इतका जोरदार होता की इमारती हालू लागल्या होता. यामुळे लोकांनी भीतीने घरातून पळ काढला आणि मोकळ्या सुरक्षित जागी गेले. सुदैवाने कोणत्याही मोठ्या नुकसानीची किंवा जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
EQ of M: 6.0, On: 04/10/2025 20:51:09 IST, Lat: 37.45 N, Long: 141.52 E, Depth: 50 Km, Location: Near East Coast of Honshu, Japan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 pic.twitter.com/tYInT4jlwY — National Center for Seismology (@NCS_Earthquake) October 4, 2025
जपान हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. या भागात पृथ्वीच्या भू-गर्भाखालील टेक्टोनिक प्लेट्स सतत हालचाली करत असतात. यामुळे या भागात सतत भूकंपा घडत असता. तसेच यामुळे त्सुनामीचाही मोठा धोका निर्माण होतो.
प्रश्न १. जपानमध्ये काय घडले?
जपान शनिवारी (०४ ऑक्टोबर) रात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहेत.
प्रश्न २. जपानमधील भूकंपाची तीव्रता किती होती?
जपानमध्ये ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी होती.
प्रश्न ३. जपानमध्ये भूकंप कुठे झाला?
जपानच्या होन्शु बेटावर पूर्व किनारी भागात तीव्र भूकंप झाला.
प्रश्न ४. जपानच्या होन्शु बेटावरी भूकंपाचे केंद्र कुठे आणि किती खोल होते?
भूकंपाचे केंद्र होन्शु बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात ५० किलोमीटर खोलीवर होते.
प्रश्न ५. भूकंप का होत असतात?
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. ज्या फिरत राहतात. या प्लेट्स सतत एकमेकींवर आदळतात असतात. यामुळे घर्षण तयार होते, दाब तयार व्हायला लागतो. यामुळे प्लेट्स तुटू लागतात आणि ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. या कारणामुळे भूकंप होतो.