
दक्षिण आफ्रिकेत हेलिकॉप्टर क्रॅश
हेलिकॉप्टर दुर्घटनेत 5 जणांचा दुर्दैवी अंत
एक विदेशी, स्थानिक गाईड आणि पायलटचा समावेश
दक्षिण आफ्रिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. माऊंट किलीमांजारो ही दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या शिखरावर अडकलेल्या आजारी पर्यटकांना रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यामध्ये 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
किलीमांजारो पर्वतावर हा मोठा अपघात घडला आहे. बाराफू कॅम्प आणि किबो समिट दरम्यान 4 ते 5 हजार मीटर उंचीवर हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. बाराफी व्हॅली गिर्यारोहकांसाठी महत्वाचा टप्पा समजला जातो. अपघात झालेले हेलिकॉप्टर अरबस AS350 B3 मॉडेलचे होते.
ही हेलिकॉप्टर कंपनी पर्यटन हंगामात या परिसरात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य राबवते. दरम्यान आजारी पर्यटकांना वाचवण्यासाठी जात असलेल्या हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटले आणि थोड्याच वेळात ते खाली कोसळले. त्यामध्ये असलेल्या 5 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये यंग देखील लागल्याची माहिती समोर येत आहे.
रशियात भीषण अपघात! लष्करी हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले अन्… ; भयानक घटनेचा Video Viral
किलीमांजारो पर्वतावर दरवर्षी 50 हजार पर्यटक येतात. अति उंचीवर गेल्यावर काही जणांना त्रास सुरू होतो. त्यावलेस या हेलिकॉप्टरचे रेस्क्यू ऑपरेशन महत्वाचे ठरते. मात्र या ठिकाणी हवामान सतत बदलत असल्याने हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहोचण्यास थोडा कालावधी लागण्याची शक्यता असते.
रशियात भीषण अपघात
रशियात एक मोठा अपघात घडला आहे. रशियन लष्कराचे Ka-226 हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून यामध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हेलिकॉप्टरचे चॉपर तुटून विमानाचे दोन तुकडे झाले आहे. रशियाच्या दागेस्तान येथील समुद्रकिनारी ही दुर्घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर समुद्रकिनाऱ्यावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी हेलिकॉप्टरची शेपटी (मागची बाजू) एका खडकाला धडली. यामुळे मागचा रोटर तुटला, तसेच टॉपरही काही तुटले. यामुळे हेलिकॉरप्टटरचा तोल गेला. यानंतर पायलटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशिर झाला होता. हेलिकॉप्टर एका घरावर कोसळले. यानंतर मोठा स्फोट झाला आणि हेलिकॉप्टरसह घरालाही आग लागली. व्हिडिओ दिसत आहे की, हेलिकॉप्टर घरावर कोसळताच स्फोट झाला आणि आगच्या ज्वाला भडकू लागल्या.