Social Media Ban : आता १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी; डिसेंबरपासून लागू होणार नवा कायदा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
आता 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी असणार आहे. यासाठी एक नवे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. सिनेटच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यात आले असून डिसेंबर २०२५ पासून हा कायदा लागी होणार आहे. हे जगात प्रथमच घडत आहे जेव्हा 16 वर्षांखालील मुले फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटोक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटले आहे की, देशातील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यत आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियात २०२५ नंतर १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरता येणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या नव्या कायद्यानुसार, 16 वर्षाखालील मुलांना Facebook, Instagram, Snapchat आणि TikTok यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मनाई आहे. यानुसार, पालकांची संमती किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या सोशल मीडिया खात्यांसाठी देखील कोणतीही सूट दिली जाणार नाही. तसेच मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाच व्यवस्था करावी लागणार आहे.
या नव्या कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला ही बंदी कशी लागू ठेवायाची यासाठी एक वर्ष देण्यात येणार आहे. जर हे कार्य पूर्ण झाले नाही तर प्लॅटफॉर्म्सला मोठा दंड भरावा लागेल. एकूण 32.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 270 कोटींचा दंड सर्व प्लॅटफॉर्म्सला द्यावा लागेल.
ऑस्ट्रेलिया सरकारेन म्हटले आहे जगभरात करण्यात आलेल्या अभ्यासातून आढळले आहे की, किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन वाढले आहे. मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असून त्यांच्या झोपेवर याचा परिणाम होत आहे. तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम दिसून आले आहे. यामुळे हे सर्व समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १० डिसेंबर २०२५ पासून हा कायदा लागू होणार आहे.
Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा
Ans: ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मूलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे.
Ans: ऑस्ट्रेलिया सरकारने देशातील मुलांच्या मानिसक आरोग्य आणि विकासासटी १६ वर्षाखालील मुलांना बंदी घातली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियात १० डिसेंबर २०२५ पासून१६ वर्षाखालील मुलांसाठी बंदी लागू होणार आहे.






