
India and Russia foil plot to assassinate Narendra Modi
Dhaka News : अमेरिकेची गुप्तचर संस्था, सीआयएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. पण भारत आणि रशियाने हा कट उधळून लावला, अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमधील शिखर परिषदेच्या दौऱ्यावर असताना बांग्लादेशची राजधानी ढाका येथे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याच्या गूढ मृत्यूनंतर एका झालेल्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑर्गनायझरच्या अलीकडील अहवालानुसार, ३१ ऑगस्ट रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका हॉटेलच्या खोलीत अमेरिकन स्पेशल फोर्सेसचे अधिकारी टेरेन्स अर्वेल जॅक्सन यांच्या गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या गूढ मृत्यूमुळे दक्षिण आशियातील, विशेषतः भारताच्या अंतर्गत भागात अमेरिकेच्या गुप्तचर कारवायांबद्दल संशय लक्षणीयरीत्या वाढला आहे.
नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! खोल दरीत कोसळली जीप कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
ऑर्गनायझरच्या अहवालात अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्याच्या मृत्यूबद्दल अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. हा अधिकारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने ढाका येथे तैनात होता का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट किंवा हत्येचा प्रयत्न करण्यासाठी हा अधिकारी बांगलादेशात तैनात करण्यात आला असावा. जॅक्सन भारताविरुद्ध आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध गुप्त ऑपरेशन किंवा असाइनमेंटवर तैनात होता, परंतू भारतीय आणि रशियन गुप्तचर यंत्रणांनी हा कट उधळून लावला, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी ढाका येथील एका हॉटेलच्या खोलीत अमेरिकन अधिकारी टेरेन्स आर्वेल जॅक्सन मृतावस्थेत आढळले. या घटनेने बांगलादेश आणि अमेरिकेतील संबंधांबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
‘ऑर्गनायझर’च्या अहवालानुसार, टेरेन्स आर्वेल जॅक्सन यांना बांगलादेशात तैनात करण्यात आले होते. सेंट मार्टिन बेटासंदर्भात बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देणे हा त्यांच्या मोहिमेचा उद्देश असावा, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
योगायोगाने, ज्या दिवशी जॅक्सन मृतावस्थेत आढळले, त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला उपस्थित होते. शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दीर्घ खाजगी चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.
ऑर्गनायझर’च्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आणि रशियन गुप्तचर संस्थांनी ढाका येथे संयुक्त कारवाई केली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला आहे.मात्र, नवभारत या दाव्याची पुष्टी करत नाही.
अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, चीनच्या टियांजिन शहरात झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान मोदी आणि पुतिन यांच्यात सुमारे ४५ मिनिटांची अनियोजित चर्चा झाली होती. या चर्चेत उच्च-प्रोफाइल आणि संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
योगायोगाने, ज्या दिवशी ही गुप्त चर्चा झाली, त्याच दिवशी ढाका येथे अमेरिकन अधिकारी टेरेन्स आर्वेल जॅक्सन मृतावस्थेत आढळले होते. त्यामुळे या दोन घटनांमध्ये काही संबंध असल्याचे विश्लेषण काही माध्यमांमध्ये व्यक्त केले जात आहे.