नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्याकडून भारताचे कौतुक ; PM मोदींकडे केली 'ही' खास मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nobel Winner Maria Corina Machado : व्हेनेझुएलाच्या (Venezuala) नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी भारताचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे. त्यांनी भारताला मदतीचे आवाहान केले आहे. व्हेनेझुएलामध्ये लोकाशाही पुनर्संचयित झाल्यानंतर मोठ्या गुंतवणूकीची आशा व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या मारिया मचाडो?
मारिया मचाडो यांनी म्हटले की, गेल्या १५ दिवसांपासून त्या एका गुप्त ठिकाणी लपलेल्या आहेत. त्यांनी भारताला महान लोकशाही देश अशा शब्दात कौतुक केले. तसेच त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यांचे आतिथ्य करण्याचा इच्छा व्यक्त केली. त्यां म्हणाल्या की, व्हेनेझुएला स्वतंत्र झाल्यावर भारत आमचा एक ‘महान मित्र’ बनू शकतो.
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मारिया यांनी हे विधान केले. तसेच त्यांनी दावा केला की, २८ जुलै २०२४ मध्ये व्हेनेझुएलात निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये विरोधकांना प्रचंड विजय मिळाला. त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंद घालण्यात आला. त्यांनी एक राजनियक म्हणून ७० मतांनी विजयी होत संसदेत स्थान मिळवले. पण राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सत्ता सोडली नाही आणि देशात दडपशाहीची क्रूर लाट आहे. यामुळे व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला आहे.
मारिया यांनी म्हटले की, मी भारताचे मनापासून कौतुक करते. त्यांनी म्हटले की, भारताच्या राजकारणाचा मी बारकारईने अभ्यासह केला आहे. तसेच महात्मा गांधींच्या संघर्षाचा उल्लेख त्यांतून मला प्रेरणा मिळते असेही म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, गांधीजींनी सर्व मानवजातीला अहिंसेच्या शक्तीचा प्रत्यय घडवला आणि दाखवून दिले की शांततेते सर्व समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
दरम्यान त्यांनी म्हटले की, संपूर्ण जगाला मादुरो यांच्या गुन्ह्यांबद्दल आधीच माहिती आहे. अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप आणि आशियातील देशांच्या पाठिंब्यांने त्यांना लोकशाहीच्या लढाईत साथ मिळाली असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी भारताकडून व्हेनेझुएला स्वतंत्र झाल्यावर मोठ्या गुंतवणुकीची आशा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, भारताकडे उर्जा, पायाभूत सुविधा आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आम्हाला यासाठी भारताची गरज असल्याचे मारिया यांनी म्हटले.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी भारताबद्दल काय म्हटले?
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी भारताला एक महान लोकशाही देश म्हणून संबोधले आहे.
प्रश्न २. मारिया मचाडो यांनी भारताकडून कोणती अपेक्षा व्यक्त केली?
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी भारताकडूने व्हेनेझुएलात उर्जा, पायाभूत सुविधा आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणूकीची आशा व्यक्त केली.
Explainer: अमेरिका आणि व्हेनेझुएला युद्धाच्या उंबरठ्यावर; अमेरिका व्हेनेझुएला हल्ला करेल का?






